अवमान याचिका दाखल करणार

By admin | Published: October 13, 2015 12:48 AM2015-10-13T00:48:32+5:302015-10-13T00:48:32+5:30

शिक्षण हक्क कायद्यानुसार, पुणे विभागातील प्रवेश नाकारणाऱ्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबाबतची कार्यवाही शिक्षण मंडळाने सुरू केली आहे.

To file a contempt petition | अवमान याचिका दाखल करणार

अवमान याचिका दाखल करणार

Next

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार, पुणे विभागातील प्रवेश नाकारणाऱ्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबाबतची कार्यवाही शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. प्रवेश नाकारलेल्याशाळांतील विद्यार्थ्यांना त्यांना २५ टक्के प्रवेश पात्र असणाऱ्या इतर खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेशाची पूर्तता १४ व १५ तारखेला सहकारनगर येथील महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग शाळेत केले जाणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागेवर प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे. तरीही काही शाळांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत. त्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. मात्र प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरालगतच्या २५ टक्के प्रवेश पात्र खाजगी विना अनुदानित शाळेत प्रवेश दिले जातील. शाळेतील शिल्लक जागा आणि विद्यार्थी संख्यांचे गुणोत्तर पाहून हे प्रवेश दिले जाणार आहेत यासाठी १४ व १५ आॅक्टोबर रोजी महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहे. काही शाळांना १४ आॅक्टोबर तर काही १५ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आले आहे. यावेळी पालकांनी आॅनलाईन पद्धतीने यापूर्वीच प्राप्त झालेल्या अ‍ॅलोटमेंट पत्र सोबत घेऊन स्कुलमध्ये उपस्थित रहायचे आहे.
काही शाळांनी प्रवेश देण्याची तयारी दाखविली तरीही त्या शाळांनी अनधिकृतपणे पालकांकडून सुविधांच्या नावांखाली काही रक्कम दिले जाईल असे पालकांकडून लिहून घेत आहेत. मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न असल्याने पालकांनाही याविरूद्ध बोलता येत नाहीये तर अधिकृतपणे शाळांनी प्रवेश देण्याची तयारी दाखविल्याने त्या पालकांना इतर पर्याय उपलब्ध नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी या पालकांची स्थितीझाली आहे. अशा रितीने सुविधांच्या नावे पैसे मागविणे हे चूकच आहे मात्र पालकांचा नाईलाज झाला आहे.
- मुकुंद किर्दत, सामाजिक कार्यकर्ते
१४ आॅक्टोबर : एसपीएम पब्लिक स्कुल टिळक रोड, परांजपे स्कुल कोथरूड, सह्णाद्री नॅशनल स्कुल, वारजे माळवाडी, मिलेनियम स्कुल, कर्वेनगर या शाळेतील प्रवेश नाकारलेले विद्यार्थी
१५ आॅक्टोबर : विखे पाटील मेमोरियल स्कुल गोखलेनगर,
एसपीएम इंग्लिश, न्यू इंडिया स्कुल
भुसारी कॉलनी, गुरूकुल शिवाजीनगर, भारतीय विद्याभवन शिवाजीनगर, कलमाडी स्कुल कर्वे रस्ता, अभिनव इंग्लिश मिडीयम स्कुल पौड फाटा, ओर्किड बाणेर रस्ता, कलमाडी स्कुल, औंध, सेवासदन एरंडवणे या शाळेतील प्रवेश नाकारलेले विद्यार्थी

Web Title: To file a contempt petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.