गुजरातच्या गुंतवणूकदारांना फडणवीसांचे आवाहन

By admin | Published: January 10, 2015 01:38 AM2015-01-10T01:38:21+5:302015-01-10T01:38:21+5:30

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता येण्याचे आवाहन केले.

Filing appeal to Gujarat investors | गुजरातच्या गुंतवणूकदारांना फडणवीसांचे आवाहन

गुजरातच्या गुंतवणूकदारांना फडणवीसांचे आवाहन

Next

मुंबई : आम्ही आमच्या ह्रदयाची कवाडे तुमच्याकरिता खुली केली आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता येण्याचे आवाहन केले. २६ जानेवारीपासून ‘आपले सरकारह्ण हे वेबपोर्टल सुरु करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत येऊन येथील गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील समस्यांचा पाढा वाचला होता. आता फडणवीस यांनी गुजरातमध्ये जाऊन केलेल्या सकारात्मक आवाहनामुळे त्याची सव्याज परतफेड झाली आहे. गांधीनगर येथील प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून फडणवीस यांनी आज तेथील गुंतवणुकदारांना साकडे घातले.
ँपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडियाह्ण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्राने ‘मेक इन महाराष्ट्रह्ण ही योजना राबवण्याचे ठरवले असल्याचे फडणवीस यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात सहा-सात नवी शहरे वसवण्याची योजना असल्याने घर बांधणीच्या क्षेत्रात गुंतवणुकीस वाव असल्याकडे लक्ष वेधले. नागपूरमधील मिहान प्रकल्प त्याचबरोबर पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांमधील विकास प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. ५० टक्के नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Web Title: Filing appeal to Gujarat investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.