वडेट्टीवारांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2016 04:54 AM2016-08-06T04:54:47+5:302016-08-06T04:54:47+5:30
आमदार विजय वडेट्टीवार तसेच ‘द हिंदू’ या दैनिकाच्या संपादक व वार्ताहर यांच्या विरोधात विधानसभेत अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला
मुंबई- रस्त्याच्या घोटाळ्यात नाव जोडल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर शुक्रवारी आमदार विजय वडेट्टीवार तसेच ‘द हिंदू’ या दैनिकाच्या संपादक व वार्ताहर यांच्या विरोधात विधानसभेत अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला.
गुरुवारी झालेल्या विधानसभा कामकाजावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्यात माझे नाव जोडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, त्यांनी आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम ३५ नोटीस देणे आवश्यक होते. त्यांनी केलेला आरोप हा नियमाविरुध्द तसेच पूर्णपणे बिनबुडाचा आहे. या प्रकरणात माझा तसेच माझ्या कुटुंबाचा दुरुन्वये संबंध नसताना माझे नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझी राजकीय मानहाणी झाली आहे. म्हणूनच मी अधिनियमातील नियमांचा आधार घेत हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे तो दाखल करुन घ्यावा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी विनंती केली.