सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

By admin | Published: May 24, 2017 02:02 AM2017-05-24T02:02:45+5:302017-05-24T02:02:45+5:30

खामगाव : श्री शिवाजी व्यायाम मंदिर संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम प्रकरण

Filing of Criminal cases on Shanda's family | सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

सानंदा कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खोटे दस्त तयार करुन कट रचत शासकीय रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिरास परत देणे, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, व्यायाम मंदिराचे सचिव दिगंबर खासणे, सहसचिव महावीर थानवी, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे, तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध २३ मे रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खामगाव नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन दयाराम जोशी यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, शहरातील श्री शिवाजी व्यायाम मंदिराची जागा ही शासकीय जागा नसताना त्यावर बांधकामासाठी घेण्यात आलेल्या दानपत्रासाठी गैरकायदेशीर शर्ती व अटी मंजूर करुन श्री शिवाजी व्यायाम मंदिरासाठी अनुदान प्राप्त करुन घेणे, या व्यायाम मंदिराच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेस परत करण्यात आला. यासाठी गैरकायदेशीर अट टाकून दानपत्र करण्याच्या अर्जावर मंजुरी देत सहायक धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्या आदेशाचा आधार घेत तत्कालीन नगराध्यक्ष सरस्वती खासणे यांनी २३ मे २००८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेतला. सदर ठराव मंजूर करताना त्यांनी स्वत:सह अशोक सानंदा यांना तटस्थ दाखविले. मात्र सरस्वती खासणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत देण्याकरिता आदेश दिले होते. त्यानंतर अशोक सानंदा नगराध्यक्ष झाल्यावर नगर परिषदेच्या ताब्यात नसलेल्या श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या इमारतीमध्ये प्रस्ताव क्रमांक १६ नुसार विविध विकास कामांना मंजुरी देत नगर परिषद मालमत्तेचे नुकसान करुन श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेचा फायदा केला. तर तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही संस्थेला शासनाच्या रकमेचा अपहार करण्यास सहकार्य केले. जागेचे दानपत्र झाल्यावर श्री शिवाजी व्यायाम मंदिराची जागा नझूल विभागामध्ये पालिकेच्या नावावर करुन घेतली, परंतु कर आकारणी सूचीनुसार सदर जागा अद्यापपर्यंत श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या मालकीची व ताब्यात आहे. यानंतर सदर जागेबाबतचे दस्त नगर पालिकेतून गहाळ झाले असून, याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारसुध्दा देण्यात आली आहे. श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या इमारतीच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार विकास निधीमधून २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले असताना कोनशिलेवर ५० लक्ष रुपये खर्च करुन दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर परिषद रेकॉर्डनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर जागा नगर परिषदेच्या ताब्यात दिली नाही, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगर परिषदेने प्राप्त केलेल्या दस्तामध्ये सदर जागा मुख्याधिकारी देशमुख यांनी २० मे २०१० रोजी न.प.ने ताब्यात घेतली असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. याबाबतचा दस्त साध्या कागदावर असून, त्यावर कोणत्याही विभागाचे नाव नाही. तसेच दिनांक, आवक-जावक क्रमांक नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात उपलब्ध नाही. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कलम ११९, १२० (ब), १९३, १९६, २०१, २०४, २१७, २१८, ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४१८, ४२०, ४२३, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filing of Criminal cases on Shanda's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.