५० हजार भरा, अन्यथा तुरुंगात जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 04:26 AM2017-02-16T04:26:15+5:302017-02-16T04:26:15+5:30
प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० हजार रुपये न्यायालयात जमा करा; अन्यथा तुरुंगात पाठवू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर : प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० हजार रुपये न्यायालयात जमा करा; अन्यथा तुरुंगात पाठवू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते उमेश बोरकर यांना बुधवारी दिली.
याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांच्यावर शिष्यवृत्ती घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. मिश्रा यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर झालेली ५९ लाख २६ हजार ३३ रुपयांची शिष्यवृत्ती अवैधपणे उचलल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे.
याचिकेत केवळ मिश्रा यांच्यावरच आरोप करण्यात आल्याने तसेच इतर शिष्यवृत्ती घोटाळेबाजांचा याचिकेत समावेश केला गेला नसल्यामुळे न्यायालयाला याचिकाकर्त्याच्या उद्देशावर
संशय आला आहे. परिणामी न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपये न्यायालयात जमा करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)