विचार करून भरा अर्ज; अन्यथा बसेल भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:19 AM2020-02-11T05:19:19+5:302020-02-11T05:19:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांची अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीचा अर्ज भरताना काळजीपूर्वक आणि विचार करूनच भरावा लागेल, नाहीतर आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
यंदा पीसीबी आणि पीसीएम गटासाठी स्वतंत्र परीक्षा आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने पीसीएम गटातून अर्ज भरल्यास आणि त्यानंतर रद्द करून पीसीबी गटातून परीक्षेचा अर्ज भरल्यास, त्या विद्यार्थ्याला पूर्वी भरलेला अर्ज रद्द करावा लागेल. मात्र, त्या अर्जासाठी भरलेली रक्कम त्याला मिळणार नसल्याचे, सीईटी सेलने सोमवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. सीईटीचा अर्ज बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना नव्याने पुन्हा शुल्काचा भुर्दंड बसेल.
याच परीक्षेच्या आधारावर अभियंत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. मागील वर्षापासून पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब निकालासाठी केला जात आहे, ज्यामध्ये निकालावेळी अनेक तक्रारी आल्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा अभियांत्रिकी व वैद्यकीय दोन्ही क्षेत्रांतही प्रवेशाची इच्छा असणाºया विद्यार्थ्यांना पीसीएमबी ही परीक्षा देण्याऐवजी त्यांनी या दोन्हीच्या म्हणजे पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) व पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) स्वतंत्र परीक्षा द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असणार आहे. स्वतंत्र परीक्षा होणार असल्याने त्यांचे शुल्क आणि अर्जही विद्यार्थ्यांना स्वतंत्र, वेगवेगळ्या पद्धतीने भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शुल्क सवलत दिली जाणार नाही.
च्आतापर्यंत शुल्क भरून नोंदणी केलेले विद्यार्थी - २,१८,११७
च्पीसीएम परीक्षेसाठी आलेले अर्ज - ८४,३३४
च्पीसीबी परीक्षेसाठी आलेले अर्ज- ८५,७५३
च्पीसीएम आणि पीसीबी परीक्षेसाठी आलेले अर्ज -४८,०३०