दारूकांडाविरोधात रिपाइंचे जेल भरो
By admin | Published: June 28, 2015 02:32 AM2015-06-28T02:32:05+5:302015-06-28T02:32:05+5:30
मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आरपीआय) शनिवारी शहरात विविध ठिकाणी जेल भरो आंंदोलन करण्यात आले.
मुंबई : मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आरपीआय) शनिवारी शहरात विविध ठिकाणी जेल भरो आंंदोलन करण्यात आले.
आठवडाभरापूर्वी घडलेल्या दारूकांडामध्ये मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन तब्बल १०४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप करीत रिपाइं कार्यकर्त्यांनी शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत हे आंदोलन केले. चेंबूरमध्ये झालेल्या आंदोलनात अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. असेच आंदोलन स्थानिक कार्यकर्त्यांनी मलबार हिल, ताडदेव, पंतनगर, सहार, गोरेगाव, आरे सब, दहिसर, धारावी, शाहूनगर, मुलुंड पोलीस ठाण्यांत केले.
पुरोहित प्रकरण : प्रतिक्रिया टाळली
भाजप आ. राज पुरोहित यांचे स्टिंग आॅपरेशन
हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे सांगत आरपीआय अध्यक्ष
रामदास आठवलेंनी त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
दारूकांडाला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शासन व्हावे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी अचूक उपाय योजावेत.
- रामदास आठवले