ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी पोलिसांचा फिल्मी अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 05:20 PM2017-06-01T17:20:26+5:302017-06-01T17:20:26+5:30
बई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरीकांना आवाहन केलं आहे.
Next
लोकमत ऑनलाइन
मुंबई, दि. 1- सध्याचं जग हे डिजीटल झालं आहे. बरेच व्यवहार आपण ऑनलाइन करतो आहे. ऑनलाइन सेवेमुळे व्यवहार पटकन होतो तसंच आपला वेळसुद्धा वाचतो. पण या ऑनलाइन व्यवहारांचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. अनेक फेक साइट्स आज सक्रिय झाल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना सामना करावा लागतो आहे. या साइट्सद्वारे लोकांची फसवणूकही बऱ्याचदा होते. ऑनलाइन साइट्सची विश्वासार्हता तपासून मगच व्यवहार करा याबद्दलची बरिच जनजागृती केली जाते आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांनीसुद्धा पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरीकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी "अग्निपथ" सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डायलॉगसह त्यांचा फोटो शेअर केला आहे
किसी भी अनजान को...
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 1, 2017
तू ना दे OTP कभी.....
या फिर पासवर्ड सभी...
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ! #ReelToRealpic.twitter.com/2IvdbSAZYQ
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस सतत नागरीकांना सतर्क करत असतात. तरीही अनेक जण त्याला बळी पडतात. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी "अग्निपथ"मधील अमिताभचा "पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान... !" हा डायलॉग फोटोवर लिहित शेअर केला आणि त्याबरोबर सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
मुंबई पोलिसांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश दिले आहेत. यावेळी पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन नंबर अशी माहिती शेअर करू नये, असं आवाहन करण्यासाठी "अग्निपथ"मधील डायलॉगचा उपयोग करण्यात आला आहे. ऑनलाइनवर "हिरोगिरी" करू नका, असं आवाहन पोलिसांनी ट्विटमधून सर्वांना केलं आहे.
याआधी स्वच्छतेचं आवाहन करण्यासाठी वाराणसीत अमिताभ बच्चन यांच्या "दीवार" सिनेमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.