भाजपमध्ये प्रवेशासाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:05 AM2019-08-24T05:05:58+5:302019-08-24T05:10:02+5:30

महाजनादेश यात्रेनिमित्त खान्देशात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली.

'Filter policy' for entry into BJP now: CM | भाजपमध्ये प्रवेशासाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ : मुख्यमंत्री

भाजपमध्ये प्रवेशासाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ : मुख्यमंत्री

Next

धुळे / जळगाव : भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते येत आहेत. मात्र पक्षात आता नेते जास्त आणि जागा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने इतर पक्षातील नेत्यांसाठी ‘फिल्टर पॉलिसी’ अवलंबली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
महाजनादेश यात्रेनिमित्त खान्देशात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली. मुख्यमंत्री म्हणाले की, यात्रेद्वारे आतापर्यंत जवळपास ४३ मतदारसंघात पोहचलो. उत्तर महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपेल. तिसरा व अंतिम टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या काळात प. महाराष्टÑ ते कोकण असा राहील. आता इतर पक्षांमध्येही यात्रेचा उत्साह संचारला आहे, त्यांनाही माझ्या शुभेच्छा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
राजकीय यात्रेची परंपरा भाजपची असून, विरोधात असताना संघर्षाची तर सत्तेत असताना संवादाची ही यात्रा आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: 'Filter policy' for entry into BJP now: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.