अंतिम ऊसदराचा फैसला आॅगस्टमध्येच
By admin | Published: May 21, 2017 12:33 AM2017-05-21T00:33:12+5:302017-05-21T00:33:12+5:30
साखर, उपपदार्थ विक्रीची माहिती आॅनलाईन करू : मलिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गत आर्थिक हंगामातील अद्याप हिशेब झालेला नाही. येत्या महिन्याभरात तो पूर्ण करून वाढीव दर किती देता येतो, याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना शनिवारी मंत्रालयात झालेल्या ऊसदर नियामक मंडळाच्या बैठकीत देण्यात आल्या. त्यामुळे गत हंगामातील उसाचा अंतिम दराचा फैसला आॅगस्टमध्ये होणाऱ्या मंडळाच्या बैठकीतच होणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक होते. साखरेसह उपपदार्थ विक्रीची माहिती आॅनलाईन करण्याची सूचना कारखान्यांना देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत ऊसदर, कारखान्यांचे व्यवस्थापन, आदी मुद्द्यांंवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांवर आर.आर.सी.ची कारवाई करता येते; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अंमलबजावणी होत नसल्याने दोन-दोन वर्षे
गुजरात दराचीच चर्चा
गुजरातमधील साखर कारखाने ४४०० रुपये दर देतात, मग येथील कारखान्यांना काय झाले? असा सवाल राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांनी केला. हे कारखाने दर का देऊ शकतात, याचा पाढा वाचत किमान गुजरातमधील कारखान्यांच्या चांगल्या गोष्टी तरी स्वीकारा, अशी सूचना बैठकीत शेतकरी नेत्यांनी केली.
दुसरा हप्ता द्या
कारखान्यांची आर्थिक पत्रके निश्चित होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा जादा दर मिळणार हेही निश्चित असल्याने अंतिम दराचा निर्णय होईपर्यंत कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली.
दृष्टिक्षेपात राज्यातील
आगामी गळीत हंगाम
२०१७ /१८ च्या हंगामात उपलब्ध
ऊस क्षेत्र ९.२३ लाख हेक्टर.
७५ लाख टन साखरेचे
उत्पादन अपेक्षित.