नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये!

By Admin | Published: December 13, 2015 01:05 AM2015-12-13T01:05:52+5:302015-12-13T01:05:52+5:30

प्राथमिक फेरीत सुमारे ३२७ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यभरातील १८ आणि गोव्याचे एक अशा १९ सर्वोत्कृष्ट नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये २ जानेवारीपासून घेण्याचे निश्चित

Final play in Panvel! | नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये!

नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये!

googlenewsNext

- महेंद्र सुके,  ठाणे
प्राथमिक फेरीत सुमारे ३२७ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यभरातील १८ आणि गोव्याचे एक अशा १९ सर्वोत्कृष्ट नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये २ जानेवारीपासून घेण्याचे निश्चित झाले आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५५व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे तीन लाखांचे प्रथम पारितोषिक मिळवण्यासाठी या १९ संस्था झुंजणार आहेत.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील १९ केंद्रांवर घेण्यात आली होती. त्या प्रत्येक केंद्रातून
एक नाटक अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार होते. मात्र अहमदनगरमधून एकही नाटक अंतिम फेरीसाठी पात्र नाही, असा निकाल लागला. सोबतच दिल्ली केंद्राचे दरवर्षी एक नाटक या स्पर्धेसाठी पाठवण्यात येते. या वर्षीपासून दिल्ली केंद्र बंद झाले. २१ जानेवारीला गोवा केंद्रात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या नाटकाने या स्पर्धेची सांगता होणार असून, तिथली प्राथमिक फेरी सध्या सुरू आहे.

Web Title: Final play in Panvel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.