राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लॉकडाऊननंतर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:29 PM2020-05-13T19:29:36+5:302020-05-13T19:36:41+5:30

कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार

The final year examinations of all the four agricultural universities in the state will now be held after the lockdown | राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लॉकडाऊननंतर होणार 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता लॉकडाऊननंतर होणार 

Next
ठळक मुद्देराज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता कृती आराखडामहाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये

पुणे: नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विविध परीक्षा संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश देण्याचा व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊननंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. 
महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोरोनाबाधित असल्याने रेड झोन मध्ये आहेत. तसेच राज्यातील कृषी महाविद्यालयांची बहुतेक वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने विलगीकरणाकरिता अधिग्रहीत केलेली आहेत. ही वसतिगृहे महाविद्यालय प्रशासनाकडे केव्हा हस्तांतरीत केले जातील, याबाबत कल्पना नाही अशा परिस्थितीमध्ये कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्याकरिता संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्र निहाय परीक्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर काही विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर घेतली जाणार आहे.
----------------
परीक्षेच्या नियोजनाचा कृति आराखडा पुढीलप्रमाणे :
* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या अंतर्गत गुणांच्या आधारे द्वितीय वर्षात प्रवेश 
* दोन वर्ष कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेतली जाणार
* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान
* तीन वर्ष कृषी तंत्र निकेतन द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या ५० आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश 
* तीन वर्ष कृषी तंत्रनिकेतन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार
* प्रथम, द्वितीय ,तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण चालू सत्रातील अंतर्गत गुणांच्या आणि मागील सत्रातील निकालाच्या सरासरीच्या आधारे गुणदान देऊन पुढील सत्रात प्रवेश
* पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वषार्तील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा लॉकडाऊन उठल्यानंतर घेणार

Web Title: The final year examinations of all the four agricultural universities in the state will now be held after the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.