...अखेर १,४४६ डॉक्टर भरले बरं का! ऑनलाइन आदेश निघाले, आता गुणवत्तापूर्ण सेवेची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:59 AM2024-03-01T06:59:29+5:302024-03-01T06:59:38+5:30

रिक्त पदांची भरती झाल्याने सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

...Finally 1,446 doctors have been filled! Online orders are out, now expect quality service |  ...अखेर १,४४६ डॉक्टर भरले बरं का! ऑनलाइन आदेश निघाले, आता गुणवत्तापूर्ण सेवेची अपेक्षा

 ...अखेर १,४४६ डॉक्टर भरले बरं का! ऑनलाइन आदेश निघाले, आता गुणवत्तापूर्ण सेवेची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली. गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १,४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाइन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 

रिक्त पदांची भरती झाल्याने सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

२९,५५६ अर्जातून केली निवड
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १,७२९ रिक्त पदांसाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज प्राप्त झाले होते. ६,५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते.
एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादीनुसार १,४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना पदस्थापनेचे आदेश देण्यात आले. 
विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त
धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: ...Finally 1,446 doctors have been filled! Online orders are out, now expect quality service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर