अखेर इफेड्रीन प्रकरणी 385 पानांचे आरोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल
By admin | Published: June 23, 2016 09:15 PM2016-06-23T21:15:18+5:302016-06-23T21:33:52+5:30
कंपनीचा माजी संचालक मनोज जैन याच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी ठाणे जिल्हा न्यायालयात 385 पानांचे आरोपपत्र दाखल केले
जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 23 - अखेर इफेड्रीनची देश विदेशात तस्करी केल्याप्रकरणी एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा माजी संचालक मनोज जैन याच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी ठाणे जिल्हा न्यायालयात 385 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. जैन आणि कंपनीचा सल्लागार पुनीत ङ्म्रींगी यांनी कशाप्रकारे सुमारे 100 किलोच्या करोडोंच्या इफेड्रीनची देश विदेशात तस्करी केली, याबाबतचे अनेक जबाब आणि पुरावे या आरोपपत्रत जोडण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.
या आधी 9 जून रोजी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी याच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी ठाणो पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जैन, पुनित, नरेंद्र काचा, नवी मुंबईचा हरदिप गिल आणि बाबा धोत्रे या पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. इफेड्रीनची तस्करी करण्यात मोठा वाटा उचलणारा जयमुखी याला अगदी अलिकडे अटक केल्यामुळे त्याच्या संदर्भातील अद्यापही तपास सुरु आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.
कंपनीचा तत्कालीन संचालक असलेल्या जैन याने पुनितसह या सर्वाना हाताशी धरुन कंपनीतील इफेड्रीन बाहेर काढले. आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याच्या मदतीने केनिया तसेच दक्षिण अफ्रिकेत या मालाची तस्करी केली. हवालामार्फत त्यासाठी त्यांनी करोडो रुपये स्विकारले. याशिवाय, मुंबई, ठाणो, नवी मुंबई आणि सोलापूर आदी परिसरात इफेड्रीनची मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणो तस्करी केली. कंपनीचा सल्लागार पुनित ङ्म्रींगी याने हा माल देश विदेशात तस्करी करण्यासाठी व्यूहरचना केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर हरदिप गिलने हा माल नवी मुंबईच्या स्थानिक मार्केटमध्ये वितरीत केला. यातील नरेंद्र काचाने सोलापूरातील कंपनीतून पाठविलेला माल गुजरातमध्ये ताब्यात घेतला. तिथे त्याने इफेड्रीनवर प्रक्रीया करुन तेच इफेड्रीन केनियात पाठविले. असे आतार्पयत किमान 1क्क् किलो पेक्षा जास्त इफेड्रीन या टोळीने गुजरातमार्फत केनियात पाठविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर बाबा धोत्रेने कंपनीतील माल बाहेर काढयासाठी पुनितला मदत केली. त्यासाठी त्याने काही मजूर आणि टेम्पोही पुरविले. स्वत: संचालक असूनही या सर्वाना कशा प्रकारे हाताशी धरुन मनोजने हजारो कोटींच्या इफेड्रीनची तस्करी करुन औषध विक्रीच्या नावाखाली तरुण पिढीला ड्रग्जच्या जाळयात ओढण्याचे घातक कृत्य केल्याचा या सर्वावर गंभीर आरोप आहे. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.