अखेर बेस्टचा पगार मंगळवारी

By admin | Published: March 19, 2017 03:34 AM2017-03-19T03:34:55+5:302017-03-19T03:34:55+5:30

मार्च महिना अर्धा उलटला तरी बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. परिणामी आता जोपर्यंत पगार मिळत नाही; तोपर्यंत कामावर जाणार नाही

Finally Best Salary Tuesday | अखेर बेस्टचा पगार मंगळवारी

अखेर बेस्टचा पगार मंगळवारी

Next

मुंबई : मार्च महिना अर्धा उलटला तरी बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. परिणामी आता जोपर्यंत पगार मिळत नाही; तोपर्यंत कामावर जाणार नाही, असा निर्णय बेस्ट कामगारांनी एकमताने घेतला आहे. मात्र बेस्ट कामगारांचा पगार २0, २१ मार्चला होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड होत असतानाच याप्रश्नी गोंधळ झाला होता. याचदरम्यान बेस्ट संघटनाही आक्रमक झाल्या होत्या आणि याप्रश्नी बैठक घेण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता. त्यानुसार, शनिवारी ना.म. जोशी मार्गावरील बाळ दंडवते स्मृती सभागृह येथे सकाळी ११ वाजता बेस्ट संघटनांची बैठक झाली. या बैठकीला बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट जागृत कामगार संघटना, बेस्ट कामगार युनियन, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार संघटना, बेस्ट एम्प्लॉईज युनियन आणि बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेस्ट कामगार-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाच्या प्रश्नावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बेस्ट उपक्रमाचा कामगार हा मुंबई महापालिकेचा कामगार असल्याने बेस्ट कामगारांना वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बेस्ट देत असलेली बससेवा मुंबई महापालिका अनुदानित तिकीट दराने मुंबईकरांना देत आहे; परिणामी फायदा-तोट्याचा विचार करणे योग्य नाही, असे मत बैठकीत मांडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट उपक्रम सातत्याने तोट्यात असल्याचे म्हणणे मांडले जात आहे; परंतु हा खासगीकरणाचा डाव आहे, असेही मत बैठकीत मांडण्यात आले. (प्रतिनिधी)

२० मार्चला सभा
- २० मार्चपर्यंत बेस्ट उपक्रमाने कामगारांना वेतन दिले नाही तर २१ मार्चपासून जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामगार कामावर जाणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
- या अनुषंगाने २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता डिलाईल रोडवरील महाराष्ट्र हायस्कूल मैदान येथे कामगारांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
- शनिवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, बेस्ट अध्यक्ष आणि अधिकारी वर्गाची बैठक झाली. या बैठकीत वेतनाचा मुद्दा बेस्ट आणि महापालिकेने तात्पुरता सोडवला आहे. २१ आणि २२ मार्च रोजी कर्मचारी वर्गाला पगार दिला जाणार आहे.

Web Title: Finally Best Salary Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.