अखेर रोजगार सेवक पदमुक्त

By Admin | Published: April 29, 2016 12:46 AM2016-04-29T00:46:06+5:302016-04-29T00:46:06+5:30

पवनी तालुक्यातील गटग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती प्रकाशित होताच ...

Finally, the employment minister's post will be free | अखेर रोजगार सेवक पदमुक्त

अखेर रोजगार सेवक पदमुक्त

googlenewsNext

अड्याळ : पवनी तालुक्यातील गटग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती प्रकाशित होताच संबंधित विभाग अधिकारी कामाला लागले होते. विशेष म्हणजे खुद रोजगार सेवक मनोज बारसागडे यांनी आपली चुक त्यावेळीच मान्य केली होती तरीसुद्धा येथील ग्रामसेवक एस. खोब्रागडे व सरपंचा जिजा बावणे यांनी याविषयी चौकशी अधिकारी पंचायत समिती पवनी यांच्याकडे लेखी बयानात कामावर एकही रूपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. माझ्या समोर भ्रष्टाचार झाला नसल्याचे त्याच ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच यांनी दिला.
रोहयोच्या कामावरील हजेरीपटात बोगस व नातेवाइकाचे नावे घालून रोजगार सेवकाने भ्रष्टाचार केल्याचे वृत्त प्रकाशित होताच वृत्ताच्या संदर्भावरून चौकशी करण्यात आली. यात रोजगार सेवक दोषी असल्याचा निर्णय चौकशी अधिकाऱ्यांनी देवून लोकमतच्या वृत्ताला दुजोरा दिला.
यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात केसलापुरी, केसलवाडा, सालेभाडा या तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यात मोठ्या संख्येने रोजगार सेवक मनोज बारसागडे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात ही सभा पार पडली. परंतु येथील ग्रामसेवक एस. खोब्रागडे यांनी हा विषय प्रोसिडिंगवर न लिहता ग्रामपंचायत लेटर हेडवर लिहल्याने काही काळ तणाव होता. परंतु हा निर्णय विषय प्रोसीडिंगवर लिहला जाणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना ग्रमसेवकाने दिल्याने तणावपूर्ण वातावरण आटोक्यात आले होते. ग्रामसभेत प्रोसीडिंगचे महत्व काय व ते नसल्याने कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात, याची कल्पनाही कदाचित या ग्रामसेवकाला नसावी काय, या ग्रामसेवकाकडे कामाचा एवढा मोठा भार आहे की गेली पाच दिवसापासून प्रोसीडिंगवर हा विषय लिहायला व त्यावर सभा अध्यक्षांची स्वाक्षरी घ्यायला वेळच मिळत नाही, असे ग्रामसेवक सांगतात.
प्रोसीडिंगची झेरॉक्स प्रत त्यावर काय लिहले आहे, अशी विचारणा केली असता ग्रामस्थांना व पत्रकारांना सुद्धा हे ग्रामसेवक नियमावली सांगतात, नियम कसे पाळले जातात ते येथील ग्रामसेवकांकडून ऐकायला मिळते. परंतु विशेष ग्रामसभेत प्रोसीडिंग का आणली गेली नाही, त्यावर पाच दिवस होवून सुद्धा सभा अध्यक्षाची स्वाक्षरी का झाली नाही, या रोजगार सेवक पदमुक्तीचा विषय व प्रोसीडिंगच्या झेरॉक्स प्रतची मागणी ग्रामस्थांकडून होत असतानाही ग्रामपंचायत मधून मिळत नाही, येथील वातावरण पुन्हा तापणार का याला सर्वस्वी जबाबदार येथील ग्रामसेवक की सरपंच राहणार, असा प्रकार पहिल्यांदा होत असल्याचा ग्रामस्थांचे मत आहे. (वार्ताहर)

Web Title: Finally, the employment minister's post will be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.