अखेर एक्स्प्रेस वेवर २२,२३ जूनला ब्लॉक
By Admin | Published: June 19, 2016 02:21 AM2016-06-19T02:21:22+5:302016-06-19T02:21:22+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पूल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी मागील आठवड्यात महामार्ग पोलिसांची परवानगी
लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पूल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी मागील आठवड्यात महामार्ग पोलिसांची परवानगी न मिळाल्याने लांबणीवर पडलेले काम बुधवारी (दि. २२) व गुरुवारी (दि. २३) करण्यात येणार आहे. दोन्ही दिवशी दुपारी १२ ते ४ दरम्यान प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी ही माहिती दिली.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी हे ब्लॉक घेण्यास परवानगी दिली आहे. महामार्गावरील बोरघाट व खंडाळा टँबचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून वाहतुकीचे नियोजन करत हे काम करावे, असे परवानगीपत्रात म्हटले आहे.
द्रुतगती मार्गावर या कामामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरून प्रवास करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे,
असे आवाहनही करण्यात आले आहे.
(वार्ताहर)