अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी

By admin | Published: September 21, 2016 02:10 PM2016-09-21T14:10:50+5:302016-09-21T14:10:50+5:30

पालघर जिल्हयाच्या जव्हार तालुक्यातील रुईघर येथील कुपोषित बालक राहुल काशिराम वाडकर याचा अखेर मृत्यू झाला.

Finally, malnourished death of Rahul failed | अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी

अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी

Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २१ -  नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला पालघर जिल्हयाच्या जव्हार तालुक्यातील रुईघर येथील कुपोषित बालक राहुल काशिराम वाडकर याची मृत्युशी सुरू असलेली झुंज बुधवारी ((दि़२१) पहाटेच्या सुमारास संपली़  जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाही़ बुधवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांच्या, राहुल या कुपोषित बालकाला सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णलायात दाखल करण्यात आले होते. त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होतीय त्याच्यावर वर पतंगशाहा कुटीर रुग्नालयात डॉ- रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले व त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 

जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी गावातील कु.राहुल काशीराम वाडकर हा २ वर्षांचा मुलगा, मात्र त्याचे वजन फक्त ५ किलो होते. तो गेल्या महिनाभरापासून अतिगंभीर अवस्थेत होता. त्याला उपचारांची गरज असल्याने, येथील आशा कार्यकर्त्या- संगीता किरकिरे या कार्यक्रतीने या कुपोषित बाळाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी पालकांना सांगितले. मात्र जव्हार येथे रुग्णालयात रहावे लागेल म्हणून त्याची आई जंगलात जाऊन लपली होती. सोमवारपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते, मात्र अखेर आज त्याचा मृत्यू झाला. 

Web Title: Finally, malnourished death of Rahul failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.