जलदूत एक्स्प्रेसला अखेर निरोप!

By Admin | Published: August 9, 2016 03:49 AM2016-08-09T03:49:33+5:302016-08-09T03:49:33+5:30

लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे

Finally the message to the Jaldoot Express! | जलदूत एक्स्प्रेसला अखेर निरोप!

जलदूत एक्स्प्रेसला अखेर निरोप!

googlenewsNext

मिरज : लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले चार महिने मिरज ते लातूर खेपा घालणाऱ्या ‘जलदूत एक्स्प्रेस’ला सोमवारी अखेर निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेने तब्बल १११ दिवस २६ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचा जगातील पहिलाच प्रसंग आहे. याची लिम्का बुकात नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले.
मजुरापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे रेल्वचा पाणी पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. यापुढेही सण, उत्सव साजरे करताना, आपत्तीला तोंड देताना अशीच एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केली. ही संकल्पना मांडणारे भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य मकरंद देशपांडे म्हणाले की, मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्याने पाणीपुरवठा शक्य झाला.
यामुळे मिरजेचा लौकिक वाढला आहे, असे आ. खाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी रेल्वे यांत्रिकी अभियंता प्रमोदकुमार, स्थानक अधीक्षक बुध्ददेव भगत, विनोद कुलकर्णी, गाडीचे चालक व्ही. एल. घटकरी, गार्ड बी. डी. सोनवणे, सहाय्यक चालक एन. व्ही. उरकुडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. सादलगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. रेल्वेचालक व्ही. एल. घटकरी यांनी समारोपाच्या फेरीचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)

१११ फेऱ्या...
२६ कोटी लिटर पाणी
वाघिण्यांमध्ये पाणी भरण्यासाठी मिरजेत रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत दोन किलोमिटर जलवाहिनी बसविण्यात आली. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या सहाय्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणाऱ्या जलदुत एक्स्प्रेसने १११ फेऱ्यांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचविले आहे. जून व जुलैमधील भर पावसाळ्यातही लातूरला पाणी टंचाई असल्याने ‘जलदूत’ला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात लातूर परिसरात पाऊस झाल्याने अखेर ८ आॅगस्टपासून बंद करण्याचा निर्णय झाला.

Web Title: Finally the message to the Jaldoot Express!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.