अखेर ‘आरटीओ’ला मिळणार नव्या ६ जीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:27 AM2018-01-31T05:27:31+5:302018-01-31T05:27:44+5:30
अनेक वर्षांपासून वापरातील गाड्या नादुरुस्त अवस्थेत असल्याने, राज्य परिवहन वाहतूक विभागाला ६ नव्या जीप घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गृहविभागाने त्यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
मुंबई : अनेक वर्षांपासून वापरातील गाड्या नादुरुस्त अवस्थेत असल्याने, राज्य परिवहन वाहतूक विभागाला ६ नव्या जीप घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गृहविभागाने त्यासाठी ३० लाखांचा निधी खर्च करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रस्ताव विभागाकडे प्रलंबित होता, असे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारकडून नियमाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई करत, महसूल मिळविणे आणि मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ व मुंबई मोटार वाहन कर अधिनियम १९५८ मधील तरतुदींची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी, विविध प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, सीमा तपासणी नाके व अधिकाºयांना वाहने पुरविण्यात आलेली आहेत.
मात्र, त्यापैकी ३३ नादुरुस्तजुन्या गाड्यांचा खर्च अवाजवी असल्याने त्या कायमस्वरूपी रद्द कराव्यात आणि त्या बदल्यात ६ नवीन जीप घेण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन मंडळाकडून गेल्या वर्षी १२ मे रोजी गृहविभागाला सादर करण्यात आला. त्यासाठी ३० लाख खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.