अखेर व्हॉटसअॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग सुरु
By admin | Published: October 21, 2016 10:37 PM2016-10-21T22:37:38+5:302016-10-21T22:37:38+5:30
सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. या मध्ये व्हॉट्सअॅप , फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अॅप ची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अॅप आहे. आपल्या युझर्स ला नेहमी नविन नविन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युझर्स ची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअॅप ने त्यांच्या युझर्सला अजून एक नविन फिचरची भेट दिली आहे. व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.मात्र हे फीचर सध्या विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे.
तस बघीतले तर मेसेंजिंग अॅप च्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही . कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.मात्र हे फीचर सध्या विंडोज फोनवर बीटा व्हर्जन वर उपलब्ध आहे.
मात्र हे व्हिडीओ कॉलिंग फीचर अँड्रॉइड आणि आयओएस साठी कधी उपलब्ध होणार याविषयी ठोस माहिती नाही. मात्र सध्या जरी फक्त विंडोज फोनवर व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर उपलब्ध असले तरी लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस साठी हे फिचर उपलब्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही .