...अखेर वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला
By admin | Published: May 18, 2017 11:58 AM2017-05-18T11:58:14+5:302017-05-18T12:36:40+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 18 - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रहदारीचा असलेला वर्सोवा पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जवळपास 4 दिवस या पुलाची दुरुस्ती सुरू होती. गेल्या रविवारपासून पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. हा पूल चार दिवस बंद ठेवण्यात आल्यानं मुंबईकडे जाणारी वाहने मनोर नाका आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली आहेत.
जुन्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याने 24 डिसेंबर 2013 पासून हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गर्डर बदलून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर 2016ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या पुलावरून ऑक्टोबर महिन्यापासून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यासाठी एकदिशा मार्ग सुरू ठेवण्यात आला. एकेरी वाहतूक 20 मिनिटे सुरू ठेवली जात असल्याने सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालकांना त्रस्त केले आहे.

या पुलावरून किती वजनाची वाहने जाऊ शकतात, याची तपासणी केली गेली आहे. एकाच पुलावरून वाहतूक सुरू ठेवल्यामुळे रविवारपासून मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सध्या अवजड वाहने मनोर आणि चिंचोटी नाक्यावरून वळवण्यात आली असून, आता ती वर्सोवा पुलावरूनही धावू शकतात. असे असले तरी सध्या हायववेर 10-10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान, जुन्या पुलाला तडे गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 जून 2014 पासून 15 टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. त्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनाही बंदीचे आदेश दिलेले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नेत्यांनी आणि स्थानिकांनी केला आहे.