संभाजी भिडेंना जबर धक्का; शिवप्रतिष्ठानमध्ये अखेर उभी फूट, युवा हिंदुस्थान संघटनेची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:54 PM2021-02-22T12:54:44+5:302021-02-22T12:56:00+5:30

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले होते, शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी याबाबतची माहिती दिली होती,

Finally split in Sambhaji Bhide Shiv Pratishthan, establishment of Yuva Hindusthan Sanghatana | संभाजी भिडेंना जबर धक्का; शिवप्रतिष्ठानमध्ये अखेर उभी फूट, युवा हिंदुस्थान संघटनेची स्थापना

संभाजी भिडेंना जबर धक्का; शिवप्रतिष्ठानमध्ये अखेर उभी फूट, युवा हिंदुस्थान संघटनेची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार वीस वर्षापासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आलो आहेसंघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले.संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही

सांगली – संभाजीराव भिडे(Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर रविवारी शिक्कामोर्तब झाले, शिवप्रतिष्ठानमधील निलंबित करण्यात आलेले कार्यवाह नितीन चौगुले यांनी मेळावा घेत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या संघटनेची घोषणा केली, राजकारणविरहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या संघटनेकडून राज्यभर काम केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले.(Split in Shiv Pratishthan organization of Sambhaji Bhide)

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले होते, शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी याबाबतची माहिती दिली होती, तेव्हापासून चौगुले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील माधवनगर रोडवर असलेल्या डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात चौगुले यांनी आपली भूमिका मांडत नव्या संघटनेची घोषणा केली.

चौगुले म्हणाले की, संभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार वीस वर्षापासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आलो आहे, कोणतीही अपेक्षा न ठेवता भिडे यांनी दिलेले कार्य करत आलो, या कालावधीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानचे काम वाढवले. २०१३ पासून पूर्णवेळ काम करताना गडकोट मोहिमेसह सर्व उपक्रम प्रभावीपण राबवले, भिडे यांनीही पूर्ण विश्वास व्यक्त केल्याने चांगले काम करू शकलो, मात्र संघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले. माझी बदनामी सुरूच ठेवताना त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून निलंबन केले. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

५-७ वर्षापूर्वी शिवप्रतिष्ठानपासून दूर झालेले अचानक स्वत:च्या फायद्यासाठी पुन्हा सक्रीय झाले, त्यावेळी भिडे यांना त्यांच्या हेतूबद्दल कल्पना दिली होती, याच चौकडींनी आपली बदनामी केली असली तरी यापुढेही शिवप्रतिष्ठानचे उपक्रम तितक्याच ताकदीने राबवले जातील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही राजकारणविरहित संघटना असेल, संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात संघटना काम करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

भिडे यांच्याबद्दल आदर कायम

शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले असले तरी संभाजी भिडे यांच्याविषयी आदर कायम असणार आहे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच नवीन संघटनेचे काम असणार आहे, राजकारणविरहित कामास प्राधान्य देणार असल्याची माहिती नितीन चौगुले यांनी दिली.

Web Title: Finally split in Sambhaji Bhide Shiv Pratishthan, establishment of Yuva Hindusthan Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.