...अखेर नालेसफाईला सुरुवात
By admin | Published: January 17, 2017 03:18 AM2017-01-17T03:18:45+5:302017-01-17T03:18:45+5:30
पनवेल बस स्थानकाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीजवळील नाला कचऱ्याने भरला होता.
पनवेल : पनवेल बस स्थानकाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीजवळील नाला कचऱ्याने भरला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हा नाला साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरातील बस स्थानकाच्या बाजूलाच असलेली इंदिरानगर झोपडपट्टीच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नाला स्वच्छ करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होती. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे झोपडपट्टीवासीयांचे म्हणणे होते. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी जागे झाले व सोमवारी येथील नालेसफाईला सुरु वात करण्यात आली. (वार्ताहर)
>दुर्गंधीमुळे हैराण
इंदिरानगरमधील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या बाटल्या, कचरा, पत्रावळी, काचेच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. शिवाय आरोग्याचा प्रश्नही उद्भवत होता.