अखेर नियामक मंडळाची बैठक होणार! न्यायालयाची स्थगिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:28 AM2021-02-18T02:28:54+5:302021-02-18T02:30:00+5:30

Mumbai : बुधवारी यासंबंधी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने या बैठकीला स्थगिती दिली नसल्याचे समजते. परिणामी, नियामक मंडळाच्या सदस्यांनी ठरविलेली ही बैठक होणार आहे.

Finally there will be a meeting of the Board of Governors !, no adjournment of the court | अखेर नियामक मंडळाची बैठक होणार! न्यायालयाची स्थगिती नाही

अखेर नियामक मंडळाची बैठक होणार! न्यायालयाची स्थगिती नाही

googlenewsNext

मुंबई : नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी यासंबंधी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने या बैठकीला स्थगिती दिली नसल्याचे समजते. परिणामी, नियामक मंडळाच्या सदस्यांनी ठरविलेली ही बैठक होणार आहे.
नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली विशेष बैठक घटनाबाह्य असून, त्यावर स्थगिती आणावी यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यात १८ फेब्रुवारीच्या बैठकीला न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी नियामक मंडळाच्या सदस्यांनी आयोजित केलेली बैठक होणार आहे. आता नियामक मंडळाच्या सदस्यांच्या या बैठकीत नक्की कोणते निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विशेष बैठकीला आक्षेप 
नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली विशेष बैठक घटनाबाह्य असून, त्यावर स्थगिती आणावी यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 

Web Title: Finally there will be a meeting of the Board of Governors !, no adjournment of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.