अर्थसाहाय्य योजना राज्य मराठी विकास संस्थेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 03:06 AM2016-06-17T03:06:46+5:302016-06-17T03:06:46+5:30

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसाहाय्य’ ही योजना आता राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे.

Financial Assistance Scheme to State Marathi Development Agency | अर्थसाहाय्य योजना राज्य मराठी विकास संस्थेकडे

अर्थसाहाय्य योजना राज्य मराठी विकास संस्थेकडे

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसाहाय्य’ ही योजना आता राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत ‘बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसाहाय्य’ ही योजना समाविष्ट करण्यात आली होती. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना आणि मंडळांना २० लाख रुपये (प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य दिले जाते. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती.
परंतु या योजनेचा विषय हा राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील ‘अन्य राज्यांत व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे’ या उद्दिष्टाचाच भाग असल्यामुळे ही योजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राज्य मराठी विकास संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात राज्य मराठी विकास संस्था आता १७ एप्रिल २०१५ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेले
निकष व मार्गदर्शक सूचनांच्या आधारे
या योजनेची अंमलबजावणी
करेल. (प्रतिनिधी)

Web Title: Financial Assistance Scheme to State Marathi Development Agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.