ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

By admin | Published: January 19, 2015 12:59 AM2015-01-19T00:59:45+5:302015-01-19T00:59:45+5:30

व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी

Financial literacy is important with knowledge | ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची

Next

मुख्यमंत्री फडणवीस : इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्सचे उद्घाटन
नागपूर : व्यक्तिमत्त्व व देशाच्या विकासासाठी ज्ञानासोबतच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. गुंतवणूकदारात जागृती निर्माण व्हावी यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमात ते बोलत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज, एल अ‍ॅन्ड टी म्युच्यअल फंड आणि मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, बीएसई चे एमडी आशीषकुमार चव्हाण, सीडीएसएलचे पी.एस.रेड्डी, मनी बी च्या संचालक शिवानी दाणी, एल अ‍ॅन्ड टी चे यशवंत देवस्थळी कैलास कु लकर्णी आदी उपस्थित होते.
लोकांना बँका व आर्थिक क्षेत्राचे ज्ञान असल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. देशातील तरुणाईचा विकासासाठी उपयोग करावयाचा असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक कुठे व कशी करावी, गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्याची हमी आहे का, याची खात्री असायला हवी. दुप्पट-तिप्पट व्याज देणारा पैसा आणणार कोठून याचाही गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा. १९९० व्या दशकात संगणक ज्ञान महत्त्वाचे होते. आता आपण इंटरनेट वापरायला लागलो आहे. २१ वे शतक हे आर्थिक साक्षरतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ९० टक्के बँका व वित्तीय संस्था मुंंबई, ठाणे, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात आहेत. याच भागात बचत असून कर्ज वाटप केले जाते. अर्थातच उद्योगही याच भागात आहेत. विदर्भ व मराठवाड्यात हे प्रमाण ३.५ टक्के आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील १३ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. यातून ४० कोटी भारतीय बँकिंग क्षेत्राशी जोडले. लोकांचा आर्थिक क्षेत्रात सहभाग असल्याशिवाय विकास शक्य नाही या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवानी दाणी यांनी मनी बी इन्स्टिट्यूटच्या कार्याची माहिती देऊ न सुरक्षित गुंतवणुकीचे आवाहन केले. यावेळी पी.एस.रेड्डी, वाय. एम.देवस्थळी यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
१० हजार युवकांना प्रशिक्षण
विदर्भातील १० हजार युवकांना बीएसईच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा आशीष कुमार चव्हाण यांनी केली. नागपुरात स्टॉक एक्सचेन्ज संदर्भात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच लघु व मध्यम उद्योगांना बीएसईकडे नोंदणी करता यावी यासाठी शिबिर आयोजित केले जातील,अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकल्पाला मनपाची मदत
रिटेल क्षेत्रात चांगली गुंतवणूक व्हावी, या हेतूने इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहराला लाभ होणार असल्याने या उपक्रमाला महापालिकेकडून सहकार्य करण्याची ग्वाही प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.

Web Title: Financial literacy is important with knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.