सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार

By Admin | Published: September 18, 2016 03:43 AM2016-09-18T03:43:26+5:302016-09-18T03:47:52+5:30

जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते.

Find an opportunity for social and economic development | सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार

सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार

googlenewsNext

मुंबई : जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. देशाच्या जलवाहतुकीत ४ टक्क्यांनी वाढ झाली असून, येत्या दोन वर्षांत देशातील बंदरांची क्षमता १६५ मेट्रीक टन वाढण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेएनपीटी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने काम करत असून, येथे व्यापाराला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाले पाहिजे. मरिन ड्राइव्ह येथे ‘जेट्टी वॉटर स्पोर्ट्स’ उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा विषय मार्गी लागेल. कुलाबा ससून डॉकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असून, येथे अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्यात येईल. रस्त्यांच्या चौपदरीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी यातून शोधली पाहिजे, असे म्हणणे तज्ज्ञांनी मांडले.
>राज्यातल्या पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा आढावा घेणाऱ्या ह्यलोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हह्ण अंतर्गत ह्यबंदरे आणि जहाज वाहतूक : बंदर जोडणी योजना, देशांतर्गत जलमार्ग, बंदर औद्योगिकीकरण आणि सागरमालाह्ण या विषयांवर, बंदर विकास सादरीकरणात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, इनलॅन्ड वॉटरवेजचे प्रवीर पांडे आणि जेएनपीटीचे नीरज बन्सल यांनी आपआपली मते मांडली.
विनोद बहेती यांनी बंदर आणि जलप्रकल्पांविषयीचे सादरीकरण केले. ते म्हणाले, देशाला जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्रामार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. देशात १२ मोठी बंदरे आहेत. शिवाय सुमारे १८० लहान बंदरे आहेत. देशाला ७ हजार ५०० किलोमीटरपेक्षा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. देशाला लाभलेल्या भौगोलिक परिस्थितीचा आपण फायदा घेतला पाहिजे. सागरमाला हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासोबतच राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्पही तेवढाच महत्त्वाचा आहे. देशाच्या जलवाहतुकीत ४ टक्क्यांनी वाढ झाली असून, येत्या दोन वर्षांत देशातील बंदरांची क्षमता १६५ मेट्रीक टन वाढण्याची आशा आहे. मोठ्या बंदरांसह छोट्या बंदरांची क्षमताही वाढेल; मात्र याकरिता छोट्या बंदरांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
नीरज बन्सल यांनी जेएनपीटी हे देशातील मोठे बंदर असल्याचे सांगत या बंदराची क्षमता दुप्पट होण्याच्या मार्गावर असल्याचे नमूद केले. बंदरातील वाहतुकी अंतर्गत आयात-निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येत असून, बंदरावरील वाढता ताण कमी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. शिवाय जलवाहतुकीच्या दृष्टीकोनातून परवाने कसे सुटसुटीत करता येतील? याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, पायाभूत सेवा-सुविधा वाढविण्यावर भर दिला पाहिजे. कंटेनर वाहतुकीचा विचार करता याबाबत थोड्याफार समस्या असल्या तरीदेखील त्याही सोडविल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेएनपीटी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने काम करीत असून, येथे व्यापाराला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाले पाहिजे. जलवाहतुकीबाबत राज्याचे धोरण चांगले असले तरीदेखील यात बदलही अपेक्षित आहेत. एकंदर जलवाहतूक क्षेत्रात निर्माण झालेली दरी भरून काढण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारने केले पाहिजे.
संजय भाटिया यांनी मागील दोन वर्षांत जलवाहतुकीत मोठे बदल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, आपण आपली उत्पादन क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन वर्षांत उल्लेखनीय बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा विचार करता जलवाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न आहे. ई-बिझनेस वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट हे आपले ह्यहोम पोर्टह्ण असून, मालवाहतुकीत सातत्य ठेवण्यात येईल. मालवाहतुकीसह प्रवासी वाहतुकीवर भर देण्यात येणार आहे. पूर्व दिशेकडील बंदरांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, काही प्रमाणात जागेचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र हा प्रश्नही निकाली काढण्यात येईल. प्रवासी वाहतुकीचा विचार करताना पायाभूत सेवासुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मरिन ड्राइव्ह येथे ह्यजेट्टी वॉटर स्पोर्ट्सह्ण उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा विषय मार्गी लागेल. कुलाबा ससून डॉकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असून, येथे अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्यात येईल. आर. के. अगरवाल यांनी औद्योगिकीकरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, औद्योगिकीकरणाचा विचार करता देशातील बंदरे एकमेकांना जोडण्यावर भर देण्यात येत आहे. बंदरांलगत औद्योगिकीकरण महत्त्वाचे असून, बंदरांचा अधिकाधिक अभ्यास करत या क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे.
प्रवीर पांडे यांनी बंदरांच्या विकासामुळे आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. नॅशनल वॉटर वे, नवी बंदरे आणि रस्ते वाहतुकीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले; शिवाय गंगा आणि ब्रह्मपुत्रासारख्या नद्यांतून पावसाळा वगळता उर्वरित महिने जलवाहतूक वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असेही मत मांडत हे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. शिवाय जेव्हा आपण कोळशासारखे घटक आयात करतो; तेव्हा ते घटक कुठे उतरवायचे? हा प्रश्न मोठा असतो. हा प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. रस्त्यांच्या चौपदरीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी यातून शोधली पाहिजे. आणि सागरी वाहतुकीद्वारे अधिकाधिक लक्ष मालवाहतुकीकडे केंद्रित करण्याची गरज आहे.

>रस्ते, रेल्वेचे जाळे पसरणार
चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘सीएनबीसी टीव्ही १८’चे प्रशांत नायर यांनी केले. या वेळी नायर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली.
प्रशांत नायर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष होत 
आहे का?
प्रवीर पांडे : पायाभूत सेवा-सुविधा आपण देत आहोत. मात्र हे प्रमाण कमी आहे. जलवाहतुकीचा विचार करता पायाभूत सेवासुविधांकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे; शिवाय पायाभूत सेवा-सुविधा उभारताना त्याला 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची 
जोड देणे महत्त्वाचे आहे.
प्रशांत नायर : प्रवासी वाहतुकीबाबत काय सांगाल?
प्रवीर पांडे : जमुना विकास प्रकल्पाला जागतिक बँकेने मदत केली आहे. 
प्रवासी वाहतुकीसाठीही जागतिक बँक मदत करण्यास तयार आहे. इतर काही नवे जलप्रकल्प असून, त्यांचा अभ्यास सुरू आहे.
प्रशांत नायर : रोड आणि रस्ते वाहतुकीबाबत काय सांगाल?
आर. के. अगरवाल : 
रेल्वे जाळे आणि रस्त्यांच्या जाळ्यांवर आम्ही भर देत आहोत. शेवटी जलवाहतूक समृद्ध करायची म्हटले तरी 
रेल्वे आणि रस्त्यांच्या विकासावर भर देणे 
तेवढेच गरजेचे आहे.

Web Title: Find an opportunity for social and economic development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.