निवडणुकीसाठी 'अॅप'वर शोधा मतदार क्रमांक
By admin | Published: February 20, 2017 08:20 PM2017-02-20T20:20:08+5:302017-02-20T20:20:08+5:30
निवडणुकीसाठी 'अॅप'वर शोधा मतदार क्रमांक
अमरावती : अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे ६६६.ेंू५ङ्म३ी१२ीं१ूँ.ङ्म१ॅ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर आपला मतदानाचा अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक, घराचा पत्ता, प्रभाग क्रमांक, अंतिम मतदार यादी क्रमांक, विधानसभा क्रमांक, वय, लिंग, ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता व खोली क्रमांक यांची माहिती मिळेल. सदर संकेतस्थळावर विधानसभा मतदारसंघानुसारही नाव व मतदान केंद्र शोधता येईल. मतदान ओळखपत्र क्रमांकानुसारही मतदानाचा अनुक्रमांक व मतदान केंद्र शोधता येणार आहे. या संकेतस्थळावर मतदार यादीतील नाव शोधण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहे. अमरावती
महानगरपालिकाच्या एएमटी कॉर्प डॉट ओआरजी यावर ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक शब्द शोधल्यास आडनाव प्रमाणे शोधले जाईल, दोन शब्द (नाव व आडनाव) शोधल्यास नाव व आडनाव प्रमाणे शोधले जाईल आणि तीन शब्द शोधल्यास संपूर्ण नाव शोधले जाईल. मतदाराचे नाव शोधण्यासाठी पूर्ण नावातील पहिली तीन आद्याक्षरे स्पेस देऊन भरल्यास त्वरित मतदान अनुक्रमांक व मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. या शिवाय एएमसी व्होटर सर्च डॉट ओआरजी या संकेतस्थळावरून जावून मतदाराला आपले माहिती त्वरीत उपलब्ध होणार आहे.
या सर्च इंजिनचा सर्व मतदारांनी उपयोग करावा तसेच इतरांनाही याबाबत कळवावे असे आवाहन मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी केले आहे. २१ फेब्रुवारीला महापालिका निवडणूक होऊ घातली असून आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक मतदारांना मतदान स्लिप देण्याचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)