एका मिनिटात शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन

By admin | Published: January 18, 2017 12:34 PM2017-01-18T12:34:00+5:302017-01-18T12:34:00+5:30

जर तुमचा स्मार्टफोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय तर निराश होऊ नका. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन तुम्ही चक्क एका मिनिटात शोधू शकाल.

Find your lost smartphone in one minute | एका मिनिटात शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन

एका मिनिटात शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन

Next

तुषार भामरे 

मुंबई, दि. 18 - जर तुमचा स्मार्टफोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय तर निराश होऊ नका. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन तुम्ही चक्क एका मिनिटात शोधू शकाल. गुगलने असं एक फिचर दिलंय ज्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन हरवल्यावर तो शोधणं अगदी सहज शक्य आहे.

पहिली स्टेप:सर्वात आधी इतर स्मार्टफोन अथवा कंप्युटरवरून तुमचं जी-मेल अकाउंट साईन इन करा. तुमच्या स्मार्टफोनमधेजे अकाउंट तुम्ही वापरत होतात त्याच अकाउंटवरून साईन इन करणं गरजेचं आहे.

(गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स)
दुसरी स्टेप: यानंतर गुगलच्या होमपेजवर जाऊन ‘Find my phone’ असं टाईप करा. समोर आलेल्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनची यादी समोर येईल ज्यात तुम्ही आधी वापरलेल्या स्मार्ट्फोनची नावंही असतील. आता या यादीतून तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनच्या नावावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर गुगल मॅप/नकाशा उघडेल.


तिसरी स्टेप: या मॅपमध्ये तुम्हाला तुमच्या फोनची लोकेशन दिसेल. गुगल तुमच्या स्मार्टफोनच्या लोकेशनला ट्रेस करेल आणि तुम्हाला तो कुठे आहे त्याची माहिती दाखवेल. तुम्ही कुठून प्रवास करून आला असाल आणि तुम्ही फोन नक्की कुठे हरवलाय त्यासाठी हे फिचर खुपच उपयुक्त आहे. तुम्हाला फोनची लोकेशन कळाल्यावर त्याला योग्य स्थळी जाऊन तुम्ही शोधू शकाल.

इतर महत्त्वाचे पर्याय:
जर तुम्ही फोन घरीच विसरून आला आहात किंवा इतर ठिकाणी कुठे फोन गहाळ झाला असेल तर त्याला तुम्ही फुल वॉल्यूमवर रिंग करू शकता.

तुमचा फोन सायलेंटवर असेल तरी तो फुल वॉल्यूमवर वाजेल. फक्त अशावेळी त्याची बॅटरी संपलेली असायला नको. फोन रिंग करण्याचा पर्याय तुम्हाला मॅपच्या तळबाजूला दिसेल. जर तुम्हाला तुमचा फोन चुकीच्या हाती गेलाय असं वाटत असेल तर फोनला लॉक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमच्या फोनमधला सर्व डेटा डिलीट करायचा असेल तर याचा पर्यायही इथे उपलब्ध आहे. तुमच्या फोनमधला सर्व डेटा यामुळे डिलीट होईल.



लक्षात ठेवा: या सगळ्या ट्रिक्स तेव्हाच काम करतील जेव्हा तुमचा मोबाईल डेटा ऑन असेल किंवा तुमचा मोबाईल इतर मार्गाने इंटरनेटशी कनेक्टेड असेल.

(tusharbhamre@gmail.com)

 

Web Title: Find your lost smartphone in one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.