रस्तेवाढीचा मार्ग सापडेना! जिल्हा अन् ग्रामीण रस्त्यांची लांबी ‘जैसे थे’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 04:09 AM2018-03-09T04:09:05+5:302018-03-09T04:09:05+5:30

रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Finding the path to the rug! District and rural roads were 'like' | रस्तेवाढीचा मार्ग सापडेना! जिल्हा अन् ग्रामीण रस्त्यांची लांबी ‘जैसे थे’  

रस्तेवाढीचा मार्ग सापडेना! जिल्हा अन् ग्रामीण रस्त्यांची लांबी ‘जैसे थे’  

Next

मुंबई  - रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
२०१४-१५ मध्ये प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ५०५८५ किलोमीटर होती. २०१५-१६ मध्ये ती केवळ २५९ किलोमीटरने वाढून ५०८४४ किमी इतकी झाली. २०१६-१७ मध्ये ५२६३७ किमी इतका आहे. इतर जिल्हा रस्त्यांची आकडेवारी अशी : २०१४-१५ - ५८११५ किमी, २०१५-१६ - ५८११६ किमी आणि २०१६-१७ - ५८११६ किमी.
ग्रामीण रस्त्यांमध्येही वाढ होऊ शकली नाही. २०१४-१५ मध्ये १४५८७९ किमी, २०१५-१६ मध्ये १४५८८१ किमी तर २०१६-१७ मध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी १४५८८१ किमी इतकी होती.
राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण मात्र वाढले. २०१४-१५ मध्ये राज्यात ४७६६ किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१५-१६ मध्ये हा आकडा ७४३८ किमीवर गेला तर २०१६-१७ मध्ये हा आकडा १२२७५ किमीवर गेला. त्याचवेळी २०१४-१५ मध्ये ६१६३ किमीचे प्रमुख राज्य महामार्ग होते. ते २०१५-१६ मध्ये ५१८० किमी झाले तर २०१६-१७ मध्ये े ३८६१ किमी इतके झाले. प्रमुख राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने हा आकडा कमीकमी होत गेल्याची शक्यता आहे.
रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मार्च २०१७ पर्यंत ८६३४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत १६१४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात आला आणि त्यावर २ हजार २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

गेल्या ५३ वर्षांत राज्याने रस्तेबांधणीत विक्रमी काम केले. १९६५-६६मध्ये राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी केवळ ५१७८८ किमी होती. २०१६-१७ मध्ये ती ३ लाख ३ हजार ३५९ किमी इतकी झाली. १७ हजार ५२४ किमीचे ग्रामीण रस्ते १ लाख ४५ हजार ८८१ किमीवर गेले.

Web Title: Finding the path to the rug! District and rural roads were 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.