देखण्या चेह-यासाठी फिलर्सचा ट्रेंड, प्लास्टिक सर्जन, स्कीन स्पेशालिस्टची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:13 AM2017-09-20T03:13:49+5:302017-09-20T03:13:51+5:30
नवरात्रीत चेहरा सुंदर, उजळ, टवटवीत दिसावा, यासाठी सध्या पार्लर्समध्ये जशी गरबाप्रेमींची गर्दी होते आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी प्लास्टिक सर्जन आणि स्किन स्पेशालिस्टकडेही होते आहे.
प्रज्ञा म्हात्रे।
ठाणे : नवरात्रीत चेहरा सुंदर, उजळ, टवटवीत दिसावा, यासाठी सध्या पार्लर्समध्ये जशी गरबाप्रेमींची गर्दी होते आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी प्लास्टिक सर्जन आणि स्किन स्पेशालिस्टकडेही होते आहे. यंदाच्या नवरात्रीपूर्वी त्वचेचे फिलर्स करुन घेण्याचा ट्रेण्ड दिसून येत आहे. फिलर्स ही त्वचेवरील प्रक्रिया आहे आणि चेहरा आकर्षक दिसावा, यासाठी त्याकडे गरबाप्रेमी जास्त वळत असल्याचे प्लास्टिक सर्जननी सांगितले.
नवरात्रीत तरुणाई गरबा खेळण्यासाठी तरूणाईची सर्वाधिक गर्दी होते. हा गरबा हौैसे-मौजेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला कॉर्पोरेट इव्हेण्टचे स्वरुप आले आहे. त्यामुळे दिलखेचक नृत्यासोबतच लूक, उत्तम वेशभूषा, केशभूषेपर्यंत अनेक स्पर्धा घेतल्या जातात. गरब्यात आपण ‘सेंटर आॅफ अॅट्रॅक्शन’ असावे, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू होते. जसजसे दिवस जवळ येतात तसतशी ही तयारी जोर धरु लागते. यात पेहराव असो किंवा मेकअप साºयासाºयाचीच तयारी तरुणाई करते. जसा ट्रेण्ड तसा लूक करण्याकडे कल असतो. त्यामुळे पार्लर्सकडे पावले वळत आहेत. यात तरुणी आघाडीवर आहेत.
पाल्ररसोबत यंदा गरबाप्रेमींत फिलर्स करुन घेण्याचा ट्रेंड असल्याचे प्लास्टिक सर्जन समीर कारखानीस यांनी सांगितले. ओठांचा आकार हवा तसा करून घेणे, गालांचा उठाव, डोळ््यांच्या खालचा भाग सुरकुत्यारहीत करणे-त्याचा काळेपणा घालवणे, नाकाची ठेवण, चेहरा-खास करून हुनवटीची ठेवण बदलणे यासाठी हे फिलर्स केले जातात. यात ओठ आणि चेहºयाचे फिलर्स
करुन घेण्याला तरुणींची जास्त पसंती आहे. तरुण मुलेही फिलर्स करतात. जॉ लाईन (हनुवटीचा निमुळता भाग) वाढविण्याकडे तरुणांचा कल असतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
फिलर्स ही त्वचेची प्रक्रिया आहे. इंजेक्शनच्या साहाय्याने हे फिलर्स केले जातात. या फिलर्सचा इफेक्ट सहा महिने राहतो. फिलर्स करुन घेण्याची प्रक्रिया महागडी आहे. पण तरीही त्वचेबाबत जागरूक असणारी तरुणाई या महागड्या प्रक्रिया करुन घेण्यास पसंती देते. फिलर्स ही सर्जरी नाही. त्यामुळे त्यासाठी फार तयारीची गरज लागत नाही. आठवडाभरआधी फिलर्स केले की नवरात्रीपर्यंत त्याचा हवा तसा इफेक्ट येतो. फिलर्सच्या प्रक्रियेला पाच ते दहा मिनिटे लागतात. एका भागाच्या एका इंजेक्शनसाठी २२ ते २५ हजारांचा खर्च येतो, अशी माहिती कारखानीस यांनी दिली. फिलर्स करुन घेण्याचे प्रमाण ८० टक्के तरुणींत आणि २० टक्के तरूणांत असल्याचे त्यांनी सांगितले. फिलर्ससोबतच लेझरच्या साह्याने अनावश्यक केस काढण्याच्या - हेअर रिमुव्हल प्रक्रियेकडेही तरुणाई वळते आहे. यातही तरूणी आघाडीवर आहेत. ज्यांना बॅकलेस चोळी घालायची आहे, त्या तरुणी पाठीवर ही प्रक्रिया करुन घेतात. तसेच, चेहºयावरही ज्यांना अनावश्यक केस नको आहेत, ते तेथे ही प्रक्रिया करुन घेतात. तिला साधारण १० सिटींग लागतात. दोन सिटींगमध्ये दीड ते दोन महिन्यांचे अंतर ठेवावे लागते. त्यामुळे यासाठी
सहा महिनेआधीच तरुणी तयारी करतात. नवरात्र आले की फक्त फायनल टच अप देतात, असा तपशील त्यांनी दिला.
>डाग, खड्डे काढण्यावर ट्रिटमेंटमध्ये भर
चेहºयावरील डाग, खड्डे काढण्यासाठी, चेहºयावर तजेला-उजळपणा आणण्यासाठी, त्वचा नितळ करण्यासाठी लेझर फेशियल, केमिकल पिलिंग, मायक्रो डर्मा प्रेजन या त्वचा उपचारांकडेही तरुणाई मोठ्या प्रमाणात वळते. हे उपचार तुलनेने स्वस्त असल्याने याचाही जास्त ट्रेण्ड असल्याचे कारखानीस म्हणाले.
>इंटरनेटमुळे जागरूकता
त्वचेच्या प्रक्रियेसाठी ही तरुणाई सेलिब्रेटीला कॉपी करतेच. परंतु आता इंटरनेटवरही याची माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्यात जागरूकता आली आहे. परंतु या प्रक्रियेसाठी क्वालिफाईड प्लास्टिक सर्जनकडेच जावे,
असे त्यांनी सुचवले.