पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

By admin | Published: May 31, 2016 01:20 PM2016-05-31T13:20:37+5:302016-05-31T13:21:58+5:30

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) लागलेल्या आगीनंतर झालेल्या स्फोटात लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे

Fire brigade in Pulgaon; 17 deaths | पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

Next
>गजानन चोपडे - 
 
मृतांमध्ये कर्नल आर. एस. पवार आणि मनोज के. यांचा समावेश
 
नागपूर/ पुलगाव (वर्धा), दि. 31 - देशातील सर्वात मोठे लष्करी शस्त्रसाठ्याचे ठिकाण असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) सोमवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या स्फोटात  लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या १३ जवानांचा समावेश आहे. मृतांचा आकडा २२ च्या घरात जाण्याची शक्यता भांडारातील अग्निशमन दलाच्या जवानाने व्यक्त केली आहे. 
 
यातील १९ जखमींना वर्धा येथील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या घटनेचा अहवाल मागितला असून ते स्वत: पुलगाव येथे जाणार असल्याचे समजते. प्रचंड प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली असली तरी परिसरातील गावांमध्ये दहश्तीचे वातावरण आहे. दरम्यान लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग हे पुलगावसाठी रवाना झाले असल्याचे समजते.
 
कर्नल आर. एस. पवार आणि कर्नल मनोज के. अशी मृतांची नावे असून उर्वरित नावे कळू शकली नाही. स्फोटाची तीव्रता ऐवढी भीषण होती की त्यात अग्निशमनचे वाहनच उडाल्याचे एका जखमीच्या नातलगाने सांगितले. कॅम्प परिसरालगतच्या आगरगावातील १५००, पारधी बेडा २००, पिपरी ७० नागझरी १२०० तर मुरदगावातील १५० नागरिकांना देवळी, नांदोरा आणि पळसगाव येथे सुरक्षित स्थानी हलविण्यात आले आहे.
कॅम्प परिसरालगतच्या नागझरी गावाच्या दिशेने सर्वप्रथम लागलेली आग हळू - हळू पसरु लागली. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आगीने भीषण रुप धारण करीत दारूगोळा भांडारात प्रवेश केला. रात्री २ वाजताच्या सुमारास पहिला स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.  कॅम्प परिसरालगतच्या १५ कि.मी. परिघातील गावांतील नागरिक  प्रचंड दहशतीत आहेत. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत होत्या. कम्प परिसरालगतच्या नागझरी , इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १० गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने जीव वाचवित पळू लागले. याबाबतची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आली.
डेपो परिसरालगतच्या नागझरी येथे झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले.  हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमतला सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत आर्वी, कारंजा, नागपूर आणि भूगाव येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पुलगाव येथे भेट देण्याची सूचना केली असून पर्रीकर पुलगावला जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वर्धा जिल्हाधिकाºयांकडून या घटनेची इत्यंभू माहिती घेतली असून प्रभावित नागरिकांना सर्वोतोपरी मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय शेजारच्या जिल्हाधिकाºयांनाही सर्तक राहण्याचे सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Fire brigade in Pulgaon; 17 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.