अग्निशामक दलाची दिवाळीत तत्परता

By admin | Published: November 4, 2016 01:34 AM2016-11-04T01:34:03+5:302016-11-04T01:34:03+5:30

एकीकडे शहरात नागरिक रॉकेट बॉम्ब, फॅन्सी फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत होते.

Fire Brigade's Diwali readiness | अग्निशामक दलाची दिवाळीत तत्परता

अग्निशामक दलाची दिवाळीत तत्परता

Next


नेहरुनगर : एकीकडे शहरात नागरिक रॉकेट बॉम्ब, फॅन्सी फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत होते. दुसरीकडे अग्निशामक दलाचे जवान जिवाची बाजी लावत फटाक्यामुळे लागलेली आग विझवीत आपले कर्तव्य चोखपणे बजावीत होते. दिवाळीच्या पाच दिवसांत पिंपरी*चिंचवड शहरात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या २८ घटना घडल्या आहेत.
शहरात चिखली, पिंपरी , नेहरुनगर, चिंचवड, निगडी, सांगवी, कासारवाडी, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, बोपखेल इत्यादी भागात रॉकेट, फॅन्सी फटाके आकाशात फुटल्यानंतर त्यांचा अर्धवट जळालेला भाग दुकान, गोदाम आदी ठिकाणी पडल्यामुळे त्या वस्तूंनी पेट घेतल्यामुळे प्रामुख्याने या सर्व ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरातील या आगीच्या घटनांमध्ये आग विझवण्यासाठी दलाला १०० गाड्या लागल्या असून, त्यामधील अंदाजे पाच लाख लिटर पाण्याची गरज भासली. आग विझवण्यासाठी शहरातील पाच अग्निशामक केंद्रांच्या बंबाबरोबर पुणे महापालिका व चाकण एमआयडीसी अग्निशामक केंद्र, तसेच काही खासगी कंपन्यांच्या बंबांची मदत घ्यावी लागली. शहरातील सर्वात मोठी आग चिखली येथील एका गोदामाला लागली होती. ती विझवण्यासाठी दलाला मोठी कसरत करावी लागली. या सर्व ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांत आपला जीव धोक्यात घालून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांनी केले.
परंतु या आगीच्या घटनांमध्ये अग्निशामक दलाचे दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या २६ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या दिवाळीच्या सणादरम्यान सर्व साप्ताहिक सुट्या, सर्व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अग्निशामक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संपूर्ण दिवाळी आग विझवण्याच्या घटनांमध्ये गेली. (वार्ताहर)
>फॅन्सी फटाके, रॉकेट उडवल्यामुळे फटाके आकाशात फुटल्यानंतर त्याचा अर्धवट जळालेला भाग दुकान, गोदाम आदी ठिकाणी पडल्यामुळे त्या वस्तूंनी पेट घेतला. या प्रामुख्याने या सर्व ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा फटाक्यांवर निर्बंध आणल्यास दिवाळी दरम्यान आगीच्या घटना कमी होतील, असे संत तुकारामनगर येथील मुख्य अग्निशामक केंद्राचे अग्निशामक अधिकारी उदय वानखेडे यांनी सांगितले.

Web Title: Fire Brigade's Diwali readiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.