डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:55 PM2017-08-26T12:55:53+5:302017-08-26T16:53:43+5:30
डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ...
डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. ही आग विझविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाचे 5 टॅकर्स, उल्हासनगरमधील एक टँकर आणि आनंदनगर एमआयडीसीमधील एक टँकर अशा एकुण आठ पाण्याचे टँकर्सद्वारे प्रयत्न सुरू होते. या आठ टँकर्सच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. दरम्यान, एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे अग्निशमन दलाचे तीन अधिकारी आणि 25 कर्मचारी घटनास्थळी सध्या घटनास्थळी आहेत.
वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिस-या मजल्यावरील शालेय साहित्याच्या गोडाऊनला आग लागली होती. तसंच तिस-या मजल्यावर शालेय कपडयांचं गोडाऊन आहे. तिथेही ही आग पसरली होती. या आगीमुळे गोडाऊनमध्ये असलेले गणवेश, शूज, स्कुल बॅग, रेनकोट, शालेय शिक्षण साहित्य यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच तिसऱ्या मजल्यासह चौथ्या मजल्याचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.