देवनार डंपिग ग्राऊंडवरील आग अजूनही अनियंत्रित
By admin | Published: March 21, 2016 08:13 AM2016-03-21T08:13:49+5:302016-03-21T08:36:02+5:30
देवनार डंपिंग ग्राऊंडवरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अजून यश आलेलं नाही आहे. रविवारी रात्री डंपिंग ग्राऊंडवरील लागलेली आग सोमवारी सकाळीदेखील नियंत्रणात आलेली नाही
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २१ - देवनार डंपिंग ग्राऊंडवरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अजून यश आलेलं नाही आहे. रविवारी रात्री डंपिंग ग्राऊंडवरील लागलेली आग सोमवारी सकाळीदेखील नियंत्रणात आलेली नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 वॉटर टँकर आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
रविवारी देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतल्यानंतर आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी आठ फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर्स पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत होते. आगीमुळे पुन्हा एकदा डंपिंग ग्राऊंड दुसरीकडे हलवण्याची मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
मार्च महिन्यांत दुसऱ्यांदा देवनार डम्पिंगला आग लागली आहे. याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवर दोन दिवसांपासून लहान-लहान आगी लागत होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते, परंतु रविवारी या आगीने रौद्र स्वरूप धारण केले.
#Morning visuals from Deonar dumping ground (Mumbai), fire still not under control. (in pix: area under thick smog) pic.twitter.com/9K78BaE96g
— ANI (@ANI_news) March 21, 2016
Fire broke out at Deonar dumping ground (Mumbai) last night, situation still not under control (Last night visuals)https://t.co/b83A8otrkk
— ANI (@ANI_news) March 21, 2016