नॉन एसी डब्यात ‘फायर डिटेक्शन’ यंत्रणा

By admin | Published: November 5, 2015 03:31 AM2015-11-05T03:31:06+5:302015-11-05T03:31:06+5:30

रेल्वेच्या डब्याला आग लागल्यास त्याची माहिती तत्काळ देण्याची किंवा आग आटोक्यात आणणारी यंत्रणा नाही. रेल्वे मंत्रालयाकडून या ांदर्भात दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रयत्न सुरू होते.

'Fire Detection' mechanism in non AC coaches | नॉन एसी डब्यात ‘फायर डिटेक्शन’ यंत्रणा

नॉन एसी डब्यात ‘फायर डिटेक्शन’ यंत्रणा

Next

मुंबई : रेल्वेच्या डब्याला आग लागल्यास त्याची माहिती तत्काळ देण्याची किंवा आग आटोक्यात आणणारी यंत्रणा नाही. रेल्वे मंत्रालयाकडून या ांदर्भात दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रयत्न सुरू होते. आता अशी यंत्रणा सेवेत आणण्यासाठी रेल्वेने निर्णय घेतला असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील नॉन एसी डब्यात स्मोक व फायर डिटेक्शनची चाचणी रेल्वे प्रशासनाकडून सुरू केली आहे.
या संदर्भात २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पातच माजी रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी ‘स्मोक अँड फायर डिटेक्शन यंत्रणा’ची घोषणा केली. धूर आल्यास किंवा आग लागल्यास सायरन वाजेल व त्यावर पाणी सोडून आग विझवण्यात येईल, अशी यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर २0१३च्या नोव्हेंबरपासून एसी डब्यात स्मोक अ‍ॅण्ड फायर डिटेक्शन यंत्रणा बसवून त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जम्मू-दिल्ली राजधानी एसी एक्सप्रेसमध्ये ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवली. त्याची चाचणी सुरू असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. आता लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील नॉन एसी डब्यांमध्येही स्मोक अ‍ॅण्ड फायर डिटेक्शन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची चाचणी केली जात असल्याची माहिती ‘मरे’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

फ्रॅक्चर डिटेक्शन यंत्रणा
रुळावरुन ट्रेन घसरणे, रेल्वेत बिघाड किंवा रुळाला तडा गेल्यास त्याची माहिती देणारी यंत्रणा रेल्वे मंत्रालयाने आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘फ्रॅक्चर डिटेक्शन यंत्रणा’आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 'Fire Detection' mechanism in non AC coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.