औषधाच्या दुकानाला आग
By admin | Published: November 2, 2016 01:09 AM2016-11-02T01:09:04+5:302016-11-02T01:09:04+5:30
पाबळ फाटा परिसरातील गणेश फार्मा या औषधांच्या होलसेल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल व इतर वस्तू जळून खाक झाल्या.
शिरूर : येथील पाबळ फाटा परिसरातील गणेश फार्मा या औषधांच्या होलसेल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल व इतर वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानाचे मालक सुनील सावळेराम पानमंद यांनी म्हटले आहे.
पानमंद यांच्या मालकीचे गणेश फर्मा हे दुकान आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुकानात लक्ष्मीपूजन करून त्यांनी दुकानबंद केले व ते घरी गेले. पहाटे साडेतीनच्या सुमारास या दुकानासमोर राहणाऱ्या डॉ. मनीषा चोरे यांनी पानमंद यांना त्यांच्या दुकानाच्या खिडकीतून धूर बाहेर येत असल्याचे सांगितले. यावर पानमंद यांनी लगेच दुकानाकडे धाव घेतली. या वेळी दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. पानमंद दुकानाजवळ पोहोचण्याआधीच पोलीस व अग्निशामक दलाला तेथे उपस्थित नागरिकांपैकी एकाने भ्रमणध्वनीवरून माहिती दिली होती. यामुळे अग्निशामक दलाने तेथे येऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकान पूर्णत: जळून खाक झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी पानमंद यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानातील मोठ्या प्रमाणावर असलेला औषधांचा साठा, दोन नवीन संगणक, तीन जुने संगणक, दुकानाचे फर्निचर, फ्रीज, पंखे, फिल्टर (वॉटर), इर्न्व्हटर या सर्व वस्तू आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे सव्वातीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पानमंद यांनी यावेळी सांगितले. आग शॉटसर्किटमुळे लागली असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
>डॉ. चोरे हॉस्पिटलसमोर असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर पानमंद यांचे तीन गाळे एकत्र करून एक मोठा गाळा तयार केला होता. हे तीन गाळे दुमजली आहेत.
औषधांची होलसेल
विक्री असल्याने या गोडाऊनप्रमाणे असणाऱ्या गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरऔषधांचा साठा होता. हा सर्व साठा आगीत जळून खाक झाला.
या गाळ्यांव्यतिरिक्त आजूबाजूलाही सुदैवाने आग पसरली नाही. येथे खाली गाळे व वरती तीन मजल्यावर फ्लॅट आहेत.