मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 09:29 AM2021-01-09T09:29:17+5:302021-01-09T10:58:55+5:30

the fire incident at Bhandara District General Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

fire incident at Bhandara District General Hospital : Assistance of Rs 5 lakh each to the families of the deceased children, immediate inquiry order by the Chief Minister | मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देमृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.


भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.
 

Web Title: fire incident at Bhandara District General Hospital : Assistance of Rs 5 lakh each to the families of the deceased children, immediate inquiry order by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.