‘सनबर्न’च्या स्टेजला आग

By admin | Published: January 3, 2017 04:48 AM2017-01-03T04:48:45+5:302017-01-03T04:48:45+5:30

वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा केसनंद येथील जोगेश्वरी डोंगरावर झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलच्या मुख्य स्टेजच्या डेकोरेशन सेटला आग

Fire at 'Sunburn' stage | ‘सनबर्न’च्या स्टेजला आग

‘सनबर्न’च्या स्टेजला आग

Next

पुणे : वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा केसनंद येथील जोगेश्वरी डोंगरावर झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलच्या मुख्य स्टेजच्या डेकोरेशन सेटला आग लागून ते पूर्णपणे खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. सेट काढताना फॅब्रिकेशनची ठिणगी उडून थर्माकॉल आणि लाकडावर पडल्याने आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सनबर्न फेस्टिव्हलला होत असलेला विरोध झुगारत २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान ते पार पडले. फेस्टिव्हल संपल्यानंतर मुख्य स्टेज काढण्याचे काम चालू होते. लोखंडी रॉड काढण्याचे काम चालू असताना फॅब्रिकेशनची ठिणगी स्टेजच्या उजव्या बाजूला असणाऱ्या थर्माकॉल आणि लाकडी डेकोरेशनवर पडली. भर उन्हामध्ये ठिणगी पडल्याने थर्माकॉलच्या डेकोरेशनने तत्काळ पेट घेतला. अर्ध्या तासात स्टेजची अर्धी बाजू खाक होत असताना तेथील कामगारांनी दुसऱ्या बाजूकडील शक्य होईल तेवढे थर्माकॉलचे डेकोरेशन, वायरिंग आणि लाकडी वस्तू बाजूला केल्या. अर्ध्या तासाच्या अग्नितांडवानंतर स्टेजच्या दुसऱ्या बाजूला आग लागली असताना अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. स्टेजचा काही भाग शिल्लक असताना अग्निशामक दलाच्या जवानांनी १५ मिनिटांच्या आत सर्व आग आटोक्यात आणली. मात्र धूर आणि लाकडातील धुसमूस सुरू होती. या वेळी पाण्याची कमतरता भासल्याने दीड वाजता आगीने पुन्हा एकदा जोर धरून उर्वरित स्टेज जाळून खाक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Fire at 'Sunburn' stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.