राज्यातील १६ नगर परिषदांना अग्निशमन वाहन उपलब्ध
By admin | Published: January 29, 2015 03:33 AM2015-01-29T03:33:09+5:302015-01-29T03:33:09+5:30
शहराच्या एखाद्या कोप-यात लागलेली आग विझवण्यासाठी गल्लीबोळातून जाताना कोणतीही अडचण येऊ नये,
दिगांबर जवादे, गडचिरोली
शहराच्या एखाद्या कोप-यात लागलेली आग विझवण्यासाठी गल्लीबोळातून जाताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने राज्यातील ‘ब’ दर्जाच्या १६ नगर परिषदांना मिनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले आहे.
प्रत्येक नगर परिषदेमध्ये स्वतंत्र अग्निशमन दल कार्यरत आहे. तथापि, बहुतांश अग्निशमन दलाकडे मोठे बंब आहेत. काही वेळेस हे बंब जुन्या वस्त्यांमधील गल्लीबोळात किंवा ग्रामीण भागात प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी घटनास्थळापासून अग्निशमन वाहन दूर उभे करून त्याला पाईप जोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला जातो.
ही बाब लक्षात घेऊन शासनाने अग्निशमन सुरक्षा बळकटीकरण योजनेंतर्गत राज्यातील ‘ब’ दर्जाच्या १६ नगर परिषदांना मिनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले आहे. ही वाहने आठ दिवसांपूर्वीच प्रत्येक नगर परिषदेला उपलब्ध झाली आहेत. या वाहनाची पाणी साठवण क्षमता ३०० लिटर आहे.