मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव

By admin | Published: October 19, 2016 06:59 AM2016-10-19T06:59:08+5:302016-10-19T06:59:08+5:30

मेकर टॉवर या उत्तुंग इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला.

Fireman in the Maker Tower | मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव

मेकर टॉवरमध्ये अग्नितांडव

Next


मुंबई : दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील मेकर टॉवर या उत्तुंग इमारतीच्या विसाव्या मजल्यावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत या आगीतून बजाज कुटुंबीयांसह ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत बजाज यांच्या घरातील दोन घरगडी मृत्युमुखी पडले.
मेकर टॉवरच्या ए विंगमध्ये ही दुर्घटना घडली. मुंबईतील महत्त्वाच्या उत्तुंग इमारतींपैकी एक असलेल्या या इमारतीत काही आठ बीएचकेचे ड्युप्लेक्स फ्लॅट बनवले आहेत. त्यातील विसाव्या मजल्यावर बजाज यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सकाळी आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आग वेगाने पसरत २१ व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आग विझवण्याबरोबरच फ्लॅटमध्ये मजल्यापर्यंत पोहोचली होती. घरातील वस्तू, फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, फॉल्स सीलिंगला आगीने वेढले. त्यामुळे आग विझवण्याबरोबरच फ्लॅटमध्ये अडकलेल्या बजाज कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी जवानांची एक तुकडी कार्यरत होती.
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तीन रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. बजाज कुटुंबीयांसह ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, या आगीत बजाज यांचे दोन घरगडी गुदमरून मृत्युमुखी पडले. प्रदीपवीर कुंदन (२२), अजय कुमार पासवान (३२ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले, तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा अंत झाला होता. आगीनंतर संपूर्ण बिल्डिंग तातडीने रिकामी करण्यात आली. परिसरातील वाहतुकही थोड्या वेळासाठी बंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
>असा होता आलिशान फ्लैट : २५ मजल्यांच्या मेकर टॉवरमधील आलिशान फ्लॅट एखाद्या बंगल्याहून कमी नाहीत. बजाज यांचे चार बीएचकेचे दोन फ्लॅट होते. आतून जोडून घेऊन ते आठ बीएचकेचे केले होते. आतूनच वरच्या मजल्यावर जाण्याची सोय होती. ही इमारत उत्तुंग असल्याने अग्निशमन दलास विशेष स्नोर्कल लावून मदतकार्य करता आले.
शॉर्टसर्किटमुळे आग? : घटनास्थळी अग्निशमन दलाचे दहा बंब, पाण्याचे सहा टँकर होते. फ्लॅट क्रमांक २०१ व २११ मधील सात रहिवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
>महापालिका आयुक्तही घटनास्थळी
या इमारतीमध्ये श्रीमंत, उद्योगपती व सेलिब्रिटी राहतात. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त अजय मेहता स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाकडून पूर्ण अहवाल मागविला आहे. या इमारतीमधील अग्निशमन उपकरणे व यंत्रे कार्यरत होती. त्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शॉर्टसर्किटमुळे आग? घटनास्थळी अग्निशमन दलाचे दहा बंब, पाण्याचे सहा टँकर होते. फ्लॅट क्रमांक २०१ व २११ मधील सात रहिवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कूलिंग आॅपरेशननंतर या घटनेची चौकशी सुरू केली जाईल.

Web Title: Fireman in the Maker Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.