चिखलीत लाकडी गोदामाला आग
By admin | Published: October 31, 2016 01:07 AM2016-10-31T01:07:53+5:302016-10-31T01:07:53+5:30
लाकडाचा साठा असलेल्या चिखलीतील गोदामाला फटाक्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली.
पिंपरी : लाकडाचा साठा असलेल्या चिखलीतील गोदामाला फटाक्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत गोदामातील लाकडी मालाचे मोठे नुकसान झाले.
आग लागल्याचे निदर्शनास येताच, गोदामात काम करणारे कामगार बाहेर पळाले. आजूबाजूच्या भंगारमालाच्या दुकानांनीही पेट घेतला.अग्निशामक दलाचे दोन बंब सुरूवातीला घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात येत नसल्याने भोसरी, प्राधिकरण, तळवडे येथून तसेच पुण्याहून आणखी बंब मागविण्यात आले. रात्री साडेनऊपर्यंत आग धुमसत होती. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची त्यामुळे धावपळ उडाली.
कंपन्यांतील माल तसेच यंत्र पॅकिंग करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लाकडाचा मोठ्या प्रमाणावरील साठा या गोदामात होता. तसेच या गोदामातही लाकडी बॉक्स तयार करण्याचे काम केले जात होते. रविवारी सांयकाळी सहाच्या सुमारास या गोदामाला फटाक्यामुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामक दलाच्या संत तुकारामनगर येथील मुख्य केंद्रातुन सुरूवातीला दोन बंब पाठवले. अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी हजर झाले. आग आटोक्यात आली. मात्र पूर्णपणे विझविण्यात रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले नाही. (प्रतिनिधी)