कोळसा खाणीत आगीचे तांडव!

By admin | Published: September 14, 2014 01:50 AM2014-09-14T01:50:31+5:302014-09-14T01:50:31+5:30

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीतील विषारी वायूमुळे 55 कामगार बेशुद्ध झाल्याची घटना घडली़

Fireworks mine in coal mine! | कोळसा खाणीत आगीचे तांडव!

कोळसा खाणीत आगीचे तांडव!

Next
चंद्रपूर : सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीतील विषारी वायूमुळे 55 कामगार बेशुद्ध झाल्याची घटना घडली़ मात्र, इतर कामगारांनी प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला़ या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आह़े घटनास्थळावर वीज केंद्राचे अगिAशमन बंब दाखल झाला़ मात्र, खाणीच्या आत सर्वत्र कार्बन मोनॉक्साईट पसरल्याने आत जाऊन आग विझविणो कठीण झाले होत़े परिणामी ही आग शनिवारी रात्री उशिरार्पयत धूमसतच होती़ 
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीलगतच सिनाळा भूमिगत कोळसा खाण आहे. शुक्रवारी रात्रपाळीत पहाटे 4 च्या सुमारास या खाणीत अचानक आग लागली.  ती 34क् मीटर खोलवर पसरली होती़ आग लागली तेव्हा खाणीत 15क् कर्मचारी काम करीत होते. आगीत मोठय़ा प्रमाणात कोळसा जळत असल्याने त्यातून कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायू उत्सर्जीत झाला. याचवेळी एक्झास्ट फॅन अर्धा ते पाऊण तास बंद होता. वीज पुरवठाही खंडीत झाल्यानेविषारी वायूने 55 कामगार बेशुद्ध झाले. काही कामगारांना तात्काळ वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात, तर काहींना चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)
 
च् या आगीबाबत सुशील गोंडाणो या कामगाराने खाण प्रबंधक एस.एस. तकलक यांना माहिती दिली. मात्र, आगीच्या या घटनेकडे वरिष्ठ अधिका:यांनी दुर्लक्ष केले. 
च्एवढेच नव्हेतर खाणीत आग लागली असताना जनरल शिफ्टच्या 1क्क् कामगारांना खाणीत काम करण्यासाठी जबरदस्तीने उतरविल्याचा आरोप कामगारांनी केला आह़े
च् सुरुवातीला कमी प्रमाणात असलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल़े ती 34क् मीटर खोलवर पसरली होती़ आग लागली तेव्हा खाणीत 15क् कर्मचारी काम करीत होते.
 

 

Web Title: Fireworks mine in coal mine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.