येऊरच्या हॉटेलमध्ये गोळीबार करणा-याचा परवाना रद्द होणार
By admin | Published: July 18, 2016 08:55 PM2016-07-18T20:55:01+5:302016-07-18T20:55:01+5:30
वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने येऊरच्या एका हॉटेलमध्ये हवेत गोळीबार करण्याचा उद्दामपणा करणा:या रविंद्र पांडुरंग नलावडे (39, रा. डिसुझावाडी, वागळे इस्टेट) याचा शस्त्रपरवाना
- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि.१८ - वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने येऊरच्या एका हॉटेलमध्ये हवेत गोळीबार करण्याचा उद्दामपणा करणा:या रविंद्र पांडुरंग नलावडे (39, रा. डिसुझावाडी, वागळे इस्टेट) याचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वर्तकनगर तयार केला आहे. तो पोलीस आयुक्तांकडे पाठविला जाणार असून त्यानंतर तो रद्द करणार असल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी ह्यलोकमतह्ण ला दिली.
येऊरच्या साई ढाबा या हॉटेलमध्ये रविंद्रची त्याच्या काही मित्रंसमवेत मद्य आणि जेवणाची पार्टी रविवारी रंगली होती. याच पार्टीत ते मद्याच्या आहारी पूर्णपणे झिगांट झाल्यामुळे पार्टीचा पारा चांगलाच चढला होता. अगदी सैराट स्टाईलने त्यांनी हवेत गोळीबार करीतच आपला वाढदिवस साजरा केला. रविवारी दुपारी 4 वा. च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांनी भेट देऊन नलावडेला रात्री अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ठाणो न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नलावडे याला व्यवसायाच्या कारणास्तव 8 सप्टेंबर 2011 रोजी ङ्म्रीनगर पोलीसांच्या शिफारशीवरुन तत्कालीन पोलीस आयुक्तांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला आहे. त्याची मुदत 8 सप्टेंबर 2019 रोजी संपणार आहे. त्याच्यावर काही गुंडांनी वारही केले आहेत. त्याच्या गळयावरही जबर वार झालेला आहे. त्याच्यावरील धोका लक्षात घेऊनच त्याला स्वसंरक्षणासाठी हा परवाना दिला होता, अशी माहिती ङ्म्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली. येऊरमध्ये त्याने केलेल्या या गोळीबाराच्या पाश्र्वभूमीवर आता ते रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.
स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळालेला असतांना एखाद्या पार्टीत अत्यंत बेमुर्वत, बेफिकीरपणो आणि एखाद्याच्या जीवाला धोका होईल अशा त:हेने हवेत गोळीबार करणा:या नलावडेचा शस्त्र परवानाच रद्द करण्याचा प्रस्ताव आता तयार करण्यात येणार असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावीत यांनीही सांगितले. तर असा प्रस्ताव आल्यानंतर तो तातडीने पोलीस आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवून परवाना रद्द केला जाणार असल्याचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले.
वर्षभरातील दुसरी घटना
येऊरमध्ये साधारण वर्षभरात गोळीबार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही नोव्हेंबर 2015 मध्ये राजेश अहिरे या भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यातील हवालदारानेही त्याठिकाणी हवेत गोळीबार केल्याची चर्चा रंगली होती. परंतू, चौकशीत मात्र तो गोळीबार अन्य कोणीतरी केल्याचे उघड झाले. अर्थात, अहिरेकडे शस्त्र परवाना असल्यामुळे त्याची चौकशीही पोलिसांनी केली होती. त्यानंतर येऊरमधील विनापरवाना चालणारे हॉटेल्स वर्तकनगर पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केले होते. आता पुन्हा गोळीबार झाल्यामुळे हॉटेल चालकांवर अनेक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली.