जिल्ह्यात आता कुठेही एफआयआर
By admin | Published: February 5, 2016 04:17 AM2016-02-05T04:17:37+5:302016-02-05T04:17:37+5:30
राज्यात गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्याचे अदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
मुंबई : राज्यात गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्याचे अदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. यामुळेकुठेही तक्रार नोंदवण्याचा पीडितांचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाही, असे सांगून तक्रारकर्त्यांना इकडून तिकडे फिरवणे आता पोलीस करू शकणार नाहीत. तसेच
विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात फ्लॅगशिप कार्यक्रमाची आढावा बैठक झाली. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर आदिंसह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. शाळांना शासकीय अनुदानास पात्र होण्यास बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया अनिवार्य असण्याचा निकष लागू करण्यात यावा, तसेच फ्री-शिप योजनेस ५१ टक्के हजेरी अनिवार्य करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.