शिर्डीत उतरले पहिले विमान
By admin | Published: March 2, 2016 02:56 PM2016-03-02T14:56:22+5:302016-03-02T14:56:22+5:30
बुधवारी सकाळी 9.30 वाजता शिर्डीत पहिले चार्टर्ड विमान उतरले आहे. हे विमान पाहण्यासाठी काकडी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती
Next
>अहमदनगर, दि. २ - बुधवारी सकाळी 9.30 वाजता शिर्डीत पहिले चार्टर्ड विमान उतरले आहे. हे विमान पाहण्यासाठी काकडी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. एक वाजता विमानाने धुळ्य़ाच्या दिशेने उड्डाण केले. विमानाची ही पहिली ट्रायल यशस्वी ठरली आहे.
मुंबईच्या जुहू येथील जुन्या विमानतळावरून बॉम्बे फ्लाईंग क्लब कंपनीच्या सहा आसनी विमानाने सकाळी 8.30 वाजता शिर्डीकडे झेप घेतली. 45 मिनिटांमध्ये माळशेज घाटावरून हे विमान शिर्डीच्या हद्दीत आले. सकाळी 9.30 वाजता विमान काकडी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा पानिपतकार विश्वास पाटील या विमानातून पहिल्यांदा उतरले. शिर्डीला येणा-या पहिल्या विमानाचे पायलट होण्याचा मान कॅप्टन जे. पी. शर्मा, भगवती मेहेर यांना मिळाला. पाटील यांचे मित्र संतोष खेडलेकर हे परतीच्या प्रवासात विमानातून जाणार असल्याने शिर्डीहुन विमानात जाणारे हे पहिले प्रवाशी ठरणार आहेत. विमान उतरल्यानंतर शिवाजी गोंदकर, संतोष खेडलेकर, कोंढाजी कांढाळकर यांनी पूजन केले. माळशेट घाटातून मुंबई ते शिर्डी अशा अवघ्या 45 मिनिटात आम्ही पोहोचले. हा प्रवास अतिशय सुखद होता, अशा भावना कॅप्टन शर्मा व भगवती यांनी व्यक्त केल्या.
गत चार वर्षापासून विमानतळाचे काम सुरू होते. सहा महिन्यांपासून धावपट्टी तयार झाली होती. पहिले विमान धावपट्टीवर उतरल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. दुपारी एकच्या सुमारास विमानाने धुळ्य़ाच्या दिशेने टेक ऑफ घेतले.