वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे प्रथम
By admin | Published: April 27, 2016 03:53 AM2016-04-27T03:53:41+5:302016-04-27T03:53:41+5:30
साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले
ठाणे : साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले. या स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे यांनी बाजी मारली.
नेरळच्या दर्पण गाडे यांनी द्वितीय, खारीगावच्या गणेश बिडये यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ म्हणून कमलाकर गुर्जर व उषा साठे यांची निवड झाली. परिक्षक म्हणून कवी नारायण लाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ‘दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित’, ‘इंग्रजी माध्यम आणि डिजिटायझेनचा वाचनालयांवर परिणाम होईल का?’, सन २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आणि मला आवडलेले पुस्तक आदी विषय दिले होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. दुष्काळासाठी माणूस जबाबदार आहे. पूर्वी पूर्ण चार महिने पाऊस पडायचा. आता हे प्रमाणात व्यस्त आणि अनियमति झाले आहे. मध्येच अवकाळी पाऊस येतो. पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचे नियोजन , सिंचन प्रकल्पांची कल्पकता दाखिवली नाही. वृक्षांची बेसुमार कत्तल, जमिनीची प्रचंड धूप, पाणी वापराबाबतचा बेफिकीरपणा अशा अनेक कारणांमुळे दुष्काळ परत परत येत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल.
हे भीषण संकट दूर करायचे असेल तर नियोजन आताच केले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य आणि शिस्त दाखिवली पाहिजे अशी विविध मते या विषयावर स्पर्धकांनी व्यक्त केली. पहिला दुष्काळ इ.पू, ६४६ साली रोममध्ये पडला होता. त्यानंतर इ,स. ६४२ मध्ये इजिप्तमध्ये पडल्याचीही माहिती दिली. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात केलेली जलक्र ांती, पोपटराव पवार,अण्णा हजारे यांनी केलेले शिवारातीला प्रयोग, यांचा आदर्श समोर ठेवून नियोजन करण्यात प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे अशी उपाययोजनाही या स्पर्धेतून सुचविण्यात आली. (प्रतिनिधी)