"आयडीयल"चा हणमंत मिरकुटे नीट परीक्षेत बायोलॉजीत देशात प्रथम

By Admin | Published: July 5, 2017 03:59 AM2017-07-05T03:59:58+5:302017-07-05T03:59:58+5:30

येथील आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीचा हणमंत मिरकुटे बायोलॉजीत ३४५ गुण मिळवून भारतात सर्वप्रथम आला़ आंचल काबरा

First of all, in the country of biology in the field of "IDEAL" | "आयडीयल"चा हणमंत मिरकुटे नीट परीक्षेत बायोलॉजीत देशात प्रथम

"आयडीयल"चा हणमंत मिरकुटे नीट परीक्षेत बायोलॉजीत देशात प्रथम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : येथील आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीचा हणमंत मिरकुटे बायोलॉजीत ३४५ गुण मिळवून भारतात सर्वप्रथम आला़ आंचल काबरा नीट परीक्षेत ६६३ गुण मिळवून मराठवाड्यात सर्वप्रथम आली़ नीट परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा आयडीलच्या मिरकुटे याने बायोलॉजीत ३ गुण जास्त मिळविले आहेत, हे विशेष़
नीट बरोबरच आयडीयलच्या विद्यार्थ्यांनी एम्स, जिपमरसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतही गगनभरारी घेतली आहे़ आयडीयलच्या ३२५ विद्यार्थ्यांनी बायोलॉजीत ३६० पैकी ३०० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत़ २४७ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ५०० पेक्षा जास्त तर ५२३ विद्यार्थ्यांनी नीटमध्ये ४५० पेक्षा जास्त गुण मिळवून वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश निश्चित केला़
क्लासच्या सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हणमंत मिरकुटे ३४५, आवेज चोईन ३४२, आंचल काबरा ३३७, अपूर्वा चव्हाण ३३६, रोहीत चव्हाण ३३६, कांचन गंगेवार ३३५, गजश्री गुट्टे ३३२, कपिल मरशिवणे ३३१, आदित्य कमटलवार ३३१, अश्विनी राठोड ३३०, नसा़ीरोद्दीन शेख ३३० आणि मुस्कान शेख याने ३३० गुण पटकावले आहेत.
आजपर्यंत आयडीयल इन्स्टिट्युट आॅफ बायोलॉजीच्या जवळपास ३,५०० विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविला आहे़ जिपनर संस्थेने घेतलेल्या परीक्षेत आयडीयलचा अनिरूद्ध काबरा देशात ४० वा आला, तर गजश्री गुट्टेने ओबीसी प्रवर्गातून ८२ वा क्रमांक पटकाविला़ टीम आयडीयलचे प्रा़ नरेश भोसले, प्रा़ डॉ़ महेश पाटील, प्रा़ डॉ़ प्रभाकर देशमुख, प्रा़ डॉ़ शिवप्रसाद, प्रा़ प्रदीपसिंह कुशवाह, प्रा़ चिराग, प्रा़ रामकिशन, प्रा़ रामप्रसाद, डॉ़ मद्युश्री राऊत, प्रा़ जितेंद्र चव्हाण, प्रा़ डॉ़ स्मिता भट्टड, व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील, शेख सादीक, रामदास कांबळे, प्रशांत सूर्यवंशी, विराज पालमकर, संतोष पाटील, भास्कर पाटील आदींनी गुणवंतांचे कौतुक केले़ (वाणिज्य वार्ता)

"आयडीयल"च्या लातूर शाखेचाही श्रीगणेशा
"आयडीयल"तर्फे गतवर्षी लातूर शाखा उघडण्यात आली़ या शाखेत एम्स, जिपमर, नीट परीक्षेची सखोल तयारी करून घेण्यात आली़ प्राध्यापकांच्या तंत्रशुद्ध शिकवणीमुळे आयडीयलच्या लातूर शाखेचा विद्यार्थी ऋषिकेश केंद्रेने नीट परीक्षेत ६४३, प्रियंका काबराने ६४१ गुण मिळविले़ तर विवेक शामते याने एम्स परीक्षेत २३ वा क्रमांक मिळविला़ नेहा बास्टे एसटी प्रवर्गात २८ वी आली़ तर ऋषिकेश कणकवाडने ४१ वा क्रमांक मिळविला़ ओबीसी प्रवर्गात महेश ढाणे १३२, आकाश होनराव ३१२ यांनी यश मिळविले़ आनंद सरकटे याने एसटी प्रवर्गात ५१ वे स्थान मिळविले़ अनुजा नवले हिने एम्समध्ये यश मिळविले़ याशिवाय संजना संदीप मास्त, उत्कर्षा खामकर यांनी जिपमर परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे़

Web Title: First of all, in the country of biology in the field of "IDEAL"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.