बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम

By admin | Published: May 7, 2016 02:07 AM2016-05-07T02:07:01+5:302016-05-07T02:07:01+5:30

कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.

First of all, the first half of Mumbai, | बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम

बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम

Next

मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत मुंबईच्या आद्या मद्धी या विद्यार्थिनीने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरही ९९.५० टक्के गुणांसह मुंबईच्या मानसी पुग्गल हिने नाव कोरले आहे.
दहावीमध्ये ओदिशामधील अबिनीत परीछा हा ९९.२ टक्के मिळवून प्रथम आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून, त्यातील ईशा सेठी आणि मनन शाह हे दोघे मुंबईचे आहेत. त्यांनी ९९ टक्के गुण मिळवले.
यंदा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत पार पडलेल्या आयसीएसई परीक्षेला १ लाख ६९ हजार ३८१ विद्यार्थी बसले होते. तर आयएससीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला ४२ हजार ८८० विद्यार्थी बसले होते. (प्रतिनिधी)

ठाण्याचा मयांक वैद्य राज्यात तिसरा

आयएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याचा मयांक वैद्य ५०० पैकी ४९२ गुण (९८.४० टक्के) मिळवून राज्यात तिसरा आला.

१० वीच्या परीक्षेत ठाण्याच्या प्रियंका बागडे या विद्यार्थिनीने ९८.८ टक्के गुण मिळवून देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे खासगी क्लासचा तिने आधार घेतला नव्हता.

कधीच ठरवून अभ्यास केला नाही. वर्षभर शाळेतील अभ्यास नियमाने करीत होते. मात्र सोबतच मनाला आवडेल तेच केले. वडील खासगी कंपनीत नोकरीस असून आई गृहिणी आहे. शाळेसोबत त्यांनीही खूप प्रोत्साहन दिले होते. पुढे कॉम्प्युटर सायन्स करण्याचा विचार आहे.
- आद्या मद्धी

Web Title: First of all, the first half of Mumbai,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.